अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रंथपूजनाने सप्ताहाचा शुभारंभ

shivrajya patra

मराठी भाषा सोपी व प्रेमळ, संत-साहित्यिकांनी केली समृद्ध


सोलापूर : अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ पूजनाने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले.


यावेळी अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल अंजली मरोड, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, तहसीलदार पूनम दंडेले, तहसीलदार सरस्वती पाटील, नायब तहसीलदार बालाजी बनसोडे, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव प्राध्यापक शिवाजी शिंदे, जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य पद्माकर कुलकर्णी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

I


यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त उपस्थित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. मराठी भाषा ही शिकण्यासाठी अतिशय सोपी व प्रेमळ भाषा असून संत व साहित्यिकांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे, असे त्यांनी सांगितले.


प्राध्यापक शिवाजी शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मराठी भाषा ही समृद्ध भाषा असून, शासनाने 2024 मध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन तिची उंची वाढवली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज तसेच संतांनी मराठी भाषेतला गोडवा जगासमोर आणला, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा धारदार बाणा जगाला दाखवला. विभागानुसार भाषेची बोली बदलते, प्रत्येक भागात भाषेची लय वेगळी जाणवते. मराठी भाषा ही शब्दांनी समृद्ध अशी भाषा आहे. शासनाच्या धोरणानुसार जिल्हा मराठी भाषा समितीने अतिशय जुन्या ग्रंथांचे डिजिटायझेशन करून ग्रंथ जतन केले आहेत.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी भाषा समिती सदस्य पद्माकर कुलकर्णी यांनी केले.

*****

To Top