पत्रकारांच्या घरांच्या किंमती कमी करण्याच्या मागणीचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

shivrajya patra

नागपूर : येथील ‘रामगिरी’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सोलापुरातील  पत्रकारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत साकारण्यात येत असलेल्या घरांच्या किंमती कमी करण्याबाबत सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.


यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष  विक्रम खेलबुडे, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विठ्ठलाची मूर्ती देऊन सन्मान केला. पत्रकारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन घरांच्या किमती सर्वसामान्य पत्रकारांना परवडतील, अशा पातळीवर आणाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


यावेळी राज्य श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांच्यासह राज्यातील विविध श्रमिक पत्रकार संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.

To Top