पोलीसांविरुध्द गुन्हा; भरती करण्याच्या आमिषानं 05 लाख रुपयांची फसवणूक

shivrajya patra

गुन्ह्यात सोलापूर ग्रामीणकडील एका पोलिसाचा सहभाग


सोलापूर : पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती करण्याचे आश्वासन देऊन 05  लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोघा पोलिसांविरुध्द गुन्हा दाखल झाला. हा प्रकार सप्टेंबर 2021 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान घडला. आरोपींतील रंजीत भोसले सोलापूर ग्रामीण पोलीस दलात असून त्यानं सख्या भावाची फसवणूक केलीय. दुसरा आरोपी मुंबई पोलीस दलात सेवारत असल्याचं सांगण्यात आलंय.


मुंबई पोलीस दलातील सचिन बाळकृष्ण पाटोळे याचा हल्ली मोहोळ पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या रंजीत दशरथ भोसले (रा. विजय रेसीडेन्सी, न्यु पाच्छा पेठ, सोलापूर.) याच्याशी परिचय होता. त्यातूनच रंजीतने त्याचा पुतण्या अजय भोसले यास मुंबई पोलीसांत भरती करण्याच्या आमिषानं रोख 01 लाख रूपये मोबाईलमधील फोन पे वरून ऑनलाईन पध्दतीने रंजीतच्या सांगण्यावरून त्याचा मित्र पाटोळे दिले. 


त्यानंतर 04 लाख रूपये हात उसने म्हणून रंजीत यास नोव्हेंबर 2022 मध्ये बुर्ला कॉलेजच्या बाजूला राजेंद्र चौकात बोलावून मेव्हणा दिपक चौगुले याच्या समक्ष रंजीतच्या ताब्यात दिले होते.


रंजीत भोसले याने वेळोवेळी भाऊ बापूची भेट घेऊन चर्चा करून, त्याचा मित्र  सचिन बाळकृष्ण पाटोळे याच्याशी बोलणे केले होते. दरम्यान एक वेळेस पाटोळे याची मुंबईत लोअरपरेल इथं भेट घालून विश्वास संपादन केला होता. या प्रकरणी बापु दशरथ भोसले (रा-घर नं.13 गोंधळे वस्ती, न्यु शिवाजी नगर, सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार दोघा पोलिसाविरुद्ध कलम 420,34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक येळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.



To Top