वीज पडून जनावरांचा मृत्यू; दक्षिण तहसील कार्यालयाकडून 02, 19, 500 रुपयांच्या मदतनिधीचं वाटप

shivrajya patra

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात तीन महिन्यांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज पडून काही शेतकऱ्यांच्या जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या शेतकऱ्यांना दक्षिण तहसील कार्यालयाकडून 02, 19, 500 रुपयांच्या मदतनिधीचं तहसीलदार किरण जमदाडे यांच्या हस्ते गुरूवारी वाटप करण्यात आलंय.


या नुकसानीपोटी दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात कासेगांव येथील प्रमोद पाटील यांना गायीसाठी ₹ 37,500, धोत्री येथील ब्रह्मानंद हिप्परगे यांना गायीसाठी ₹ 37,500, बक्षीहिप्परगा येथील शिवाजी निकम यांना बैलासाठी ₹ 32,000, आणि कुंभारी येथील अप्पाशा इमडे यांच्या सहा म्हशींपैकी तीन म्हशींसाठी ₹ 1,12,500 इतकी मदतीच्या धनादेशाचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोरामणी जिल्हा परिषद गटाचे सदस्य नेताजी खंडागळे यांचीही उपस्थिती होती.


शेतकऱ्यांच्या संकट काळात प्रशासनाने दिलेल्या या आधाराबद्दल या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी कार्य तत्परतेने मदत मिळवून देण्यात विशेष प्रयत्न केल्याबद्दल शेतकऱ्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

 ***

To Top