जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानानं घेतला बालकास चावा ; मालकाविरूध्द गुन्हा

shivrajya patra

सोलापूर : जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानानं 14 वर्षीय बालकास चावा घेतल्याप्रकरणी श्वानाचे मालक मनिष कोठारी यांच्याविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मंगळवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाला. अविनाश विक्रम बंडेवार असं जखमीचं नाव आहे. 


येथील इंद्रधनु अपार्टमेंट परिसरात 19 सप्टेंबर रोजी 20.30 वा. च्या सुमारास मनिष कोठारी यांनी निष्काळजीपणाने आवश्यक ती खबरदारी न घेता मोबाईल पाहण्यात व्यस्त असताना त्यांच्या मालकीच्या श्वानानं त्यांच्या हाताला झटका मारून पळत जाऊन अविनाशच्या डाव्या हाताला चावा घेऊन डाव्या पायाला ओरबडून जखमी केले.


याप्रकरणी जखमीची आई पल्लवी विक्रम बंडेवार (रा-101 बी विंग इंद्रधनु अपार्टमेंट, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मनिष कोठारी यांच्याविरूध्द भा. न्या. संहिता कलम 291, 125 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार पवार/837 या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.


To Top