सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील रहिवाशी आणि नान्नज जि. प. प्रा. शाळेतील माजी मुख्याध्यापिका जनाबाई सुब्राव कटकधोंड यांचं बुधवारी, 16 सप्टेंबर रोजी वृध्दापकाळात अल्पशः आजारानं निधन झाले. त्या मृत्यू समयी 79 वर्षीय होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.
सोलापूर जि. प. पाणीपुरवठा चे तत्कालीन अधिकारी आणि धाराशिव जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांच्या आई होत.
गुरुवारी, 17 रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरापासून 'समृद्धी ग्रीन अपार्टमेंट', निराळे वस्ती, उमा नगरी, येथून अंत्ययात्रा निघून चौत्रा-पुणे नाका येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.
