01 लाख रुपये असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून जबरी चोरी केल्याच्या गुन्ह्यात दोघे गजाआड

shivrajya patra

शहर गुन्हे शाखेने 12 तासात केली जबरी चोरी उघड 

सोलापूर : पायी चालत निघालेल्या एका वयस्कर इसमाचा पाठलाग करुन त्यांना दमदाटी करुन त्यांच्याकडील 1 लाख रुपये असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून जबरी चोरी केल्याच्या गुन्ह्यात शहर गुन्हे शाखेच्या पथकानं दोघा संशयितांना चौकशीअंती गजाआड केलं. ही घटना दत्त चौक येथील राजेंद्र ज्वेलर्सच्या दुकानाजवळ घडली होती. शहर गुन्हे शाखेच्या पथकाला हा गुन्हा अवघ्या 12 तासात उघडकीस आणण्यात यश आलंय.


बुधवारी 16 सप्टेंबर  रोजी पोलीस उप-निरीक्षक विजय बनसुडे व त्यांचे पथक गणेश उत्सवानिमित्त पोलीस आयुक्तालय हद्दीत जबरी चोरी, मोटार सायकल चोरी, व इतर चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेत असताना, सोलापुरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयाचे पाठीमागील कम्पाऊंडचे भिंतीलगत मार्केट चौकी ते हरिभाई प्रशालाकडे जाणारा सार्वजनिक रोडचे ठिकाणी दोन संशयीत इसम एका काळ्या रंगाची MH-13-DF-5334 या क्रमांकाची युनिकॉर्न कंपनीच्या मोटारसायकलसह संशयास्पद स्थितीत थांबलेले असल्याची माहिती मिळाली. पो.उप.नि. विजय बनसुडे आणि त्यांच्या पथकानं त्या ठिकाणी जाऊन दोन्ही इसमांना ताब्यात घेतले.


 त्यांच्याकडं नाव व पत्ते विचारले असता, त्यांची नावे मल्लिनाथ राजशेखर जवळगी (वय- 36 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. सध्या घर नंबर 816, उत्तर कसबा, शेटे वाडा, सोलापूर, मुळ रा.सुलेरजवळगे, ता. अक्कलकोट.) आणि नागेश मल्लिनाथ बळते (वय- 18 वर्षे, 20 दिवस रा.816 उत्तर कसबा, शेटे वाडा सोलापूर.) हाती लागले.


त्यानंतर उभयतांकडं त्यांच्या ताब्यातील पिशवी मधील रक्कमेबाबत कसून केलेल्या चौकशीमध्ये त्या दोघांनी सोलापूर शहरातील दत्त चौक येथील राजेंद्र ज्वेलर्सच्या दुकानाजळून जात असलेल्या एका पादचाऱ्याची जबरी चोरी करून मोटार सायकलवरून पळून गेल्याचे निष्पन्न झाले. 


त्यानुसार दोन्ही इसमांच्या कब्जातील पिशवीमधील रोख 1,00,000 रुपये आणि गुन्हा करताना वापरलेली 1,00,000 रूपये किंमतीची MH-13-DF-5334 या क्रमांकाची युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण 2,00,000 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे भा. न्या. सं. कलम 309 (4), 3 (5) अन्वये दाखल असलेला गुन्हा 12 तासांच्या आत उघडकीस आणला.


ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे/वि.शा.) डॉ. अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप-निरीक्षक विजय बनसुडे आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, शंकर याळगी यांनी पार पाडली.

To Top