सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाची वार्षिक सर्वसाधारण सभा येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. या सभेत समता सैनिक दलाच्या नूतरन जी.ओ.सी.पदी आकाशवाणीचे निवृत्त वर्ग-01 चे अधिकारी शांतीकुमार कांबळे यांची तर महासचिव पदी बाळासाहेब मस्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कार्याध्यक्षपदी अनिल जगझाप ,सहसचिव म्हणून कुणाल जानराव आणि खजिनदारपदी सुनील डांगे, सहखजिनदार म्हणून विनोद जाधव यांची निवड करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी अधिमन्यू शिंदे होते.
प्रमुख सल्लागार म्हणून अण्णासाहेब भालशंकर, सुधीर चंदनशिवे, संभाजी तळभंडारे, विठ्ठल थोरे यांची निवड करण्यात आली. सांस्कृतिक विभागमध्ये सुमित्रा केरु जाधव, सुनिता गायकवाड, सुचित्रा थोरे, सुशिला भालशंकर, शीला हावळे यांच्या निवडी करण्यात आल्या. हिशोब तपासणीस म्हणून प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्यपदी रत्नदीप कांबळे, अरुण गायकवाड, भारत आवारे, मुकुंद चंदनशिवे, बाळासाहेब भोसले, अंकुश बनसोडे, रमेश शिरसाट यांच्याही निवडी एकमताने करण्यात आल्या.
येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने नॉर्थकोट मैदानावर होणारा धम्म संस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्याचे सर्वानुमते ठरले . नूतन जी. ओ. सी. शांतिकुमार कांबळे यांचा विठ्ठल थोरे आणि आण्णासाहेब भालशंकर, सुधीर चंदनशिवे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
शेवटी नूतन महासचिव बाळासाहेब मस्के यांनी सर्वांचे आभार मानल्यानंतर सर्वसाधारण सभेचे कामकाज संपले.

