सामंजस्यामध्ये समाजातीलच नव्हे तर जगातील प्रश्न सोडविण्याची शक्ती आहे : ॲड. मिलिंद थोबडे जाॅईन फाॅर पीस मल्टीपर्पज सोसायटीतर्फे शांतता पुरस्कारांचं वितरण

shivrajya patra

सोलापूर : शांत जळणाऱ्या दिव्याचा प्रकाश देखील लांबपर्यंत पोहचतो.  जीवनात शांतता लाभल्यास मानवाची उत्क्रांती होते. रागाने द्वेषाने वैयक्तिक आणि सामाजिक अधोगतीच होते. प्रत्येक धर्मात शांततेलाच प्राधान्य देण्यात आले असून शांततेतून सामंजस्यपणा येतो आणि याच सामंजस्याने समाजातीलच नव्हे तर जगातील प्रश्न सोडविता येतात, असं मत ज्येष्ठ ॲड. मिलिंद थोबडे यांनी व्यक्त केले.


जागतिक शांतता दिनानिमित्त सोमवारी, 21 सप्टेंबर रोजी जाॅईन फाॅर पीस मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह जे. पी. शांतता पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल चे माजी चेअरमन मिलिंद थोबडे यांच्या हस्ते करण्यात आले.


यंदाचा शांतता पुरस्कार माजी आमदार प्रकाश यलगुलवार , पुण्याचे जेष्ठ समाजसेवक जाहिद शेख, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांड्याचे सरपंच विजय राठोड तर संघटनात्मक पातळीवर आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला यांना प्रदान करण्यात आला. 


संस्थेचे अध्यक्ष डॉ. जैनोद्दिन मुल्ला यांनी प्रास्ताविक करताना, या पुरस्कारामागील उद्देश व संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. जैनुद्दीन पटेल, प्रा. इरफान लालकोट, अल्लाबक्ष सय्यद खान, म. शफीक रचभरे, सलीम शिकलगार, प्रा. इनुस शेख, प्रा.  महेबूब पटेल, जावेद मुजावर, सिकंदर सरोडगी, नवाज नाईकवाडी आदी पदाधिकाऱ्यांनी केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अकबर खान पठाण तर ॲड. आसिफ शेख यांनी आभार व्यक्त केले.


कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, हाजी मतीन बागवान, रामचंद्र निकम, सुनील चलवदी, बाबा शेख, माजी प्राचार्य म. हनीफ शेख, प्राचार्य इ. जा. तांबोळी, मन्नी मुजावर, शफी कॅप्टन आणि शांतता प्रेमी नागरिक उपस्थित होते

चौकट - 

दीन-दुबळ्यांना आयुष्यात उभं करणाऱ्या प्रती मी आजचा पुरस्कार अर्पण : माजी आमदार प्रकाश यलगुलवार

समाजात शांतता प्रस्थापित व अंध, अपंग, दीन-दुबळ्यांना आयुष्यात उभं करणाऱ्या प्रती मी आजचा पुरस्कार अर्पण करतो. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शांततेचा पुरस्कार करावा ते त्यांतच नैतिकता आहे, असं मत माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी व्यक्त केलं.

चौकट- 

शांततेतून साध्य केलेलं ध्येय चिरकाल टिकतं : अमोल शिंदे 

आपल्या चेहर्‍यावरील हास्यांनी देखील प्रेम, आपुलकी व्यक्त होतं. प्रेमळपणाने अशांतता देखील मावळते. शांततेतून साध्य केलेलं ध्येय चिरकाल टिकतं आणि ते शाश्वत असतं. द्वेषानं प्रेरित झालेल्याचा शेवट देखील विनाशकारी असत. जर्मनीतील हिटलरच उदाहरण देऊन शांततेच महत्व अमोल शिंदे यांनी व्यक्त केलं.

To Top