संतप्त शेतकऱ्यांचा वीज उपकेंद्राकडं मोर्चा !

shivrajya patra

कृषि पंपासाठी 05 तासांचा वीज पुरवठा; त्यातही 'पॉवर डिस्कनेक्ट' ची कटकट  जणू पाचवीला पूजलेली

उळेगांव/डांगे दत्तात्रय : दक्षिण सोलापूर तालुक्यातील ऊळेगांव येथील संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी वीज उपकेंद्र बंद केल्याचं दिसून आलं. त्यास कारणही तसंच होतं, शेतीपंपांसाठी सुरळीत आणि नियमित 08 तास वीज पुरवठा करण्यात यावा, अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी असल्यानं त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे बोललं जात आले.

यंदाच्या खरीप हंगामात प्रारंभापासून पावसानं  हुलकावण्या देत पाठ फिरवल्यानं शेतकरी खरीप पिकं कशी जगवायची, या विवंचनेत आहे. कोरडवाहू पिकं गेल्यात जमा आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या विहीर-विधंन विहिरींचं पाणी आहे, त्यांना लोडशेडींग चा 'झटका' आहे.

शेतकऱ्यांना कृषि पंपासाठी अवघा 05 तासांचा वीज पुरवठा होतो आहे, त्यातही 'पॉवर डिसकनक्ट' ची कटकट पाचवीला पूजलेलीच आहे. या कटकटीला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी रामप्रहरी उळेगांव वीज उपकेंद्रासमोर त्यांच्या रोषाला वाट मोकळी केली. 

शेतकऱ्यांचा जमाव वीज उपकेंद्रासमोर जमा होऊन आपल्या संतापाला व्यक्त करीत असल्याची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ऊळेगाव उपकेंद्राकडे धाव घेतली. त्यामुळं पुढील आंदोलनाला अर्धविराम मिळाल्याचं प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं.

शेतीपंपांना पुरेसा आणि सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने या उपकेंद्राच्या कार्यकक्षेतील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. 

शेतीसाठी नियमित 08 तास वीजपुरवठा सुरु करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून यावेळी करण्यात  आलीय. वीजपुरवठ्याबाबत प्रशासन व महावितरण काय निर्णय घेतय, या प्रश्नानं सामान्यांचं लक्ष वेधलंय.

To Top