कुमठे कनिष्ठ महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त व्याख्यानात 'स्पर्धा परिक्षा आणि नोकरीच्या संधी' यावर मार्गदर्शन
सोलापूर : विद्यार्थ्यांनी बूद्धीमत्ता, विज्ञान, गणित भाषा, इंग्रजी यावर आपले प्रभुत्व असावे. वर्तमानपत्रे वाचावीत. ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात आपले स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर अभ्यास पर्याय नाही, असं मत प्रा. ए. ए. सोनकांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
कुमठे प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात यावर्षी आगळा-वेगळा गणेशोत्सव साजरा होतो आहे. काॅलेजचे प्राचार्य अंबादास रेडे यांनी यंदाच्या उत्सवात व्याख्यानमालेचं आयोजन करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नाविन्यपूर्ण शिक्षण यावर गणपती उत्सव साजरा करण्याचे निश्चित केले होते. गुरुवारी या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफताना प्रा. ए. ए. सोनकांबळे यांनी, 'स्पर्धा परिक्षा व नोकरीच्या संधी' यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकार तपस्वी स्व. ब्रह्मदेवदादा माने यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अंबादास रेडे होते.
संस्थेचे विश्वस्त नगरसेवक जयकुमार माने यांनी विद्यार्थ्यांसाठी अशी व्याख्यानमाला सुरु करुन त्यांचा खऱ्या अर्थाने फायदाच केला आहे, असंही प्रा. सोनकांबळे यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रेडे यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणात मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी विचारपीठावर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. संजय जाधव, प्रा. हणमंत शिंदे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विजय वाळके, प्रा. राजिव निकम, प्रा. बंडोपंत बाबर यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. मनोज साठे यांनी केले. व्याख्यातांचा परिचय प्रा. विनोद थोरात यांनी केला तर सरतेशेवटी प्रा. संजय जाधव यांनी आभार मानले.


