सोलापूर : प्रा. सलीम पठाण यांचं पुस्तक "ओळख इस्लामची " अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत लिहिली गेलं आहे. पुस्तकात 'इस्लाम' संबंधी मनात असलेल्या शंका दूर करणारं अत्यंत उपयोगी आणि वाचनीय पुस्तक आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अय्यूब अहमद यांनी केले.
शिक्षण आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात सतत उल्लेखनीय कार्य करणारे सलीम पठाण (श्रीरामपूर) लिखित व प्रकाशित पुस्तक : "ओळख इस्लामीची '' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयच्या सभागृहामध्ये पार पडला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अय्यूब अहमद बोलत होते.
सोलापूरच्या पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयात झालेल्या बहु-भाषिक काव्य संमेलनात कवी राजेंद्र भोसले, कालीदास चौडेकर, प्रा. नरेंद्र गुंडेली, प्रा. वंदना कुलकर्णी, प्रा. सौ. धर्माधिकारी, कवी दत्तात्र्य इंगळे, कवी काळे, ज्येष्ठ पत्रकार आणि कवी अय्यूब अहमद नल्लामंदू, कवी मुबारक शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला, प्रकाशनानंतर या पुस्तकाच्या काही प्रती सार्वजनिक वाचनालय आणि उपस्थितांना सस्नेह भेट म्हणून देण्यात आल्या.
*****

