आपल्या मधुर आवाजाने मोहंम्मद अयाज़ यांनी निर्माण केली स्वतंत्र ओळख : सलमान ताज पाटील

shivrajya patra

हैद्राबादच्या केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण केंद्रात पार पडला मोहंम्मद अयाज़ यांचा संगीत-संध्या सांस्कृतिक कार्यक्रम

सोलापूर : गायक मोहम्मद अयाज़ यांनी आपल्या मधुर आवाजाने भारतीय संगीतात तसेच देश-विदेशात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. स्व. मोहम्मद रफी यांच्या गायकीची परंपरा जपत, त्यांनी विविध संगीत प्रकारांमध्ये आपला ठसा उमटवला आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण केंद्राचे डायरेक्टर सलमान ताज पाटील यांनी काढले.


सोलापूरचे सुरमणी व महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहंम्मद अयाज यांचा "भावसरगम" आनंद संध्या सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमात तेलंगणा राज्याचे पोलीस महासंचालक महेश भागवत यांच्या हस्ते मोहम्मद अयाज यांचा सत्कार करण्यात आला.


अनेक नामवंत कलाकारांसोबत मंचावर गाण्याचा बहुमान मोहम्मद अयाज यांना  लाभला असून देश-विदेशात त्यांनी अनेक लाईव्ह कॉन्सर्ट आणि संगीत कार्यक्रम सादर केले आहेत, हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य आहे, या शब्दात सलमान ताज पाटील यांनी मोहम्मद अयाज यांचं कौतुक केले.


यावेळेस सीडीटीआय, हैद्रबादचे डायरेक्टर सलमान ताज पाटील, प्रधान महालेखापाल श्रीमती चंदा पंडित, पंजाबचे आयपीएस केतन पाटील, नागपूरचे आयपीएस योगेश कुमार,  आयएएएस अभय सोनकर, डीसीपी विवेक देशपांडे, सीआयएसएफ सागर कोळी, एसव्हीपीएनपीएन संचित जाधव, उपकमांडेड ऑफिसर विशाल राजोळे उपस्थित होते. 


****

फोटो : पोलीस महासंचालक महेश भागवत, सलमान ताज पाटील, चंदा पंडित आणि  गायक मोहम्मद अयाज छायाचित्रात दिसत आहेत.

To Top