सोलापूर : आपखुशीने दुखापत, घातक शस्त्राच्या सहाय्याने मारहाण करुन दमदाटी, सामान्य नागरीकांना मारहाण करुन दहशत निर्माण आणि पोलीसांची नजर चुकवून अवैध मटका जुगार घेणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या शंकर चंद्रकांत धोत्रे यानला शहर आणि उर्वरित सोलापूर जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आलंय.
शंकर धोत्रे याच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्याकडून त्याच्या तडीपारी प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध सन 2019, 2020, 2025 आणि 2026 या कालावधीमध्ये उपरोक्त गुन्हे दाखल असल्याचे पोलीस माहिती कक्षाकडून सांगण्यात आलंय.
या प्रस्तावाचे अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर यांनी कार्यवाही करुन त्याचा तडीपार आदेश 04 सप्टेंबर रोजी पारीत करण्यात आला होता. त्या आदेशान्वये शंकर चंद्रकांत धोत्रे (वय- 23 वर्षे, रा. 21-सी, भगवान नगर झोपडपट्टी, सोलापूर) याला सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर जिल्ह्यातून 01 वर्षाकरीता तडीपार करण्यात आलं आहे.
