भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून राष्ट्रीय पुरस्कार

shivrajya patra


शिक्षण अन् पाककलेतील 13 गुणवंतांचा मुंबईत दिमाखदार गौरव !

मुंबई / पंकजकुमार पाटील : गेल्या 24 वर्षांपासून शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात अग्रगण्य स्थान टिकवून असणाऱ्या ‘भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई’ या मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने गुरुवारी, 03 सप्टेंबर रोजी भव्य तितकाच दिमाखदार राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. दादर (पश्चिम) येथील ‘गुरुकुल सभागृह’ येथे सकाळी 11 ते दुपारी 02 या वेळेत संपन्न झालेल्या या सोहळ्यात शिक्षण आणि पाककला या क्षेत्रांत अद्वितीय व उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील 13 गुणवंतांना राष्ट्रीय स्तरावरील विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.


या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये पाककलेच्या क्षेत्रात दीर्घकाळ विविध प्रयोग करून या कलेला नवी उंची मिळवून देणाऱ्या गृहिणींचा ‘अन्नपूर्णा रससिद्धी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2026’ देऊन गौरव करण्यात आला, तर शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल विशेष ‘ब्रह्मवादिनी गार्गी राष्ट्रीय शिक्षण सन्मान पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला.



संस्थेची 24 वर्षांची उज्ज्वल परंपरा,2003 सालापासून मुंबई, पुणे व संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेली भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था ही स्वतः उच्चविद्याविभूषित असलेले अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली निरंतर सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करत आहे. 


ही संस्था शिक्षण, आरोग्य, योग, निसर्गोपचार, कृषी, देशी गो-संवर्धन, वृक्ष संवर्धन व साहित्य या विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करते. तसेच संस्थेमार्फत वैदिक वास्तू, डाऊझिंग आणि विविध वैकल्पिक शास्त्रांचे शासनमान्य प्रशिक्षण दिले जाते.


शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदान आणि पाककलेच्या माध्यमातून जपलेली पारंपरिक व आधुनिक संस्कृती या दोन्ही क्षेत्रांतील गुणवंतांच्या अद्वितीय कार्याची दखल घेऊन हे पुरस्कार देण्यात आल्याची माहिती संस्थेच्या प्रसिद्धी प्रमुखांनी दिली.



या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद यांच्यासह शिवपद्म वडाळकर, डॉ. चंद्रमोहन रानडे, सौ. सुनीता पाटील, ज्येष्ठ शिक्षिका नंदा शिंगरे, हिलर प्रा. भाऊ म्हात्रे, मनोज वैद्य, हिलर सचिन तावरे, संदेश कदम, आर. विजयसिंह आणि शिक्षिका सौ. भावना खंडारे यांचं विशेष सहकार्य  आणि योगदान लाभले. सर्व पुरस्कार विजेत्यांचं उपस्थितांनी मनापासून अभिनंदन केले.

***

➡️ पुरस्कार प्राप्त गुणवंतांची यादी :

अन्नपूर्णा रससिद्धी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2026 (12 विजेत्या):

 ✨ सौ. स्वाती सतीश श्रीवर्धनकर

✨ सौ. स्वाती ऐलेश जोशी

✨ सौ. भावना खंडारे

✨ सौ. मनीषा सचिन पाळेकर

 ✨ सौ. तृप्ति सगुण माणगांवकर

 ✨ सौ. नीता जितेंद्र पाठारे

 ✨ अरुणा गोपाळ चरपे

 ✨ सौ. वंदना सुनील भुजाडे

 ✨ सौ. रत्नप्रभा सुधाकर सानप

 ✨ सौ. मोहिनी मोहित घरत

 ✨ सौ. भाविका भरत गोंधळी

 ✨ वैशाली संतोष सुतार


ब्रह्मवादिनी गार्गी राष्ट्रीय शिक्षण सन्मान पुरस्कार 2026 :

 ✨✨ सौ. रंजना राजेंद्र शिंदे (शिक्षण क्षेत्रातील बहुमूल्य कार्याबद्दल)

To Top