मल्लिकार्जुन खेड मित्र परिवारतर्फे गणवेश वाटप
सोलापूर : समाजात विविध क्षेत्रात व्यक्ती कार्य करीत असतात. व्यक्तीजवळ वेळ, पैसा आणि आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध असते, तरीही सर्वांनाच समाजसेवा करण्याची संधी मिळतेच असे नाही. समाजसेवा करायला ज्यांना मिळते ती व्यक्ती भाग्यवान असते, असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत चौगुले यांनी केले.
समाजसेवक मल्लिकार्जुन खेड यांच्या वाढदिवसानिमित्त मल्लिकार्जुन खेड मित्र परिवाराच्यावतीने कासेगांव येथील जिल्हा परिषद बिरोबा वस्ती शाळेत गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी चौगुले बोलत होते.
याप्रसंगी बांधकाम व्यावसायिक मल्लिकार्जुन खेड, उद्योजक नागेश मेरगु, आनंद दुलंगे, रवी रापेल्ली, श्रीमंत मेरू, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील आवताडे उपस्थित होते.
यावेळी शाळेतील 40 विद्यार्थ्यांना गणवेशाचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच वाढदिवसानिमित्त गोड खाऊ विद्यार्थ्यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजशेखर बुरकुले यांनी केले तर सुखदेव वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी पालक आणि ग्रामस्थ बहुसंख्येने
उपस्थित होते.
फोटो ओळी : मल्लिकार्जुन खेड मित्र परिवाराच्यावतीने कासेगांव येथील जिल्हा परिषद बिरोबा वस्ती शाळेत गणवेश वाटप करताना मल्लिकार्जुन खेड, नागेश मेरगु, आनंद दुलंगे, रवी रापेल्ली, श्रीमंत मेरू, सुनील आवताडे, राजशेखर बुरकुले, सुखदेव वाघमारे छायाचित्रात दिसत आहेत.
---

