ग्रामीण भागातही अंमली पदार्थ विक्रीचं नेटवर्क ! 63 ग्रॅम MD सह तरुण गजाआड

shivrajya patra

स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीत 9,89,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर : कुर्डुवाडी पोलीस ठाणे हद्दीत मेफेड्रोन ड्रग (MD) अंमली पदार्थाची विक्री नेटवर्कमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोहेल अमर मुलाणी (वय- 28 वर्षे) याला 63 ग्रॅम एमडी सह पकडले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यास 24 सप्टेंबर रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला जो गुरूवारी संपणार आहे. 


अंमली पदार्थ व त्याच्यापासून तयार झालेले इतर नशेचे पदार्थ यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत शासनासाकडून विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून देखील अंमली पदार्थविषयी जनजागृती आणि कारवाई अशी दुहेरी काम करण्यात येत आहे. 


यामध्ये 18 सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील महत्वाचे विभागाची (N-Cord‍ समीती‍)  बैठक घेऊन अंमली पदार्थाबाबत कडक कारवाई करण्याबाबत सूचना दिले आहेत. ही बैठक झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस  निरीक्षक संजय जगताप यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थविषयक गुन्हे करणाऱ्या इसमांवर लक्ष केंद्रीत करून त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवले होते.


 त्यामध्ये गोपनीय बातमीदाराकडून कुर्डुवाडी पोलीस ठाणे हद्दीत मेफेड्रोन ड्रग (MD) अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक जगताप यांना मिळाली होती. त्या बातमीनुसार पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी कुर्डुवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करमाळा रोडवरुन कुर्डुवाडी शहराकडे सोहेल अमर मुलाणी रा. कुर्डूवाडी हा त्याच्याकडील चारचाकी वाहनात मेफेड्रोन ड्रग (MD) अंमली पदार्थ विक्रीसाठी सोबत घेऊन येत असल्याची माहिती होती. 



त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासंबंधी पोलीस निरीक्षक अतुल मोहीते (कुर्डुवाडी पोलीस ठाणे) यांना सांगून, सपोनि भीमगोंडा पाटील (स्थानिक गुन्हे शाखा) यांना मदत करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक मोहीते व सपोनि पाटील हे पथकासह करमाळा रोडवरुन कुर्डुवाडी शहराकडे येणारे रस्तावरील बौद्ध विहारजवळ पोलीस पथक व पंचासह सापळा लावून थांबले. 


थोड्याच वेळात करमाळा रोडवरुन कुर्डुवाडी च्या दिशेने एक संशयित एक इसम आपल्या ताब्यात चारचाकी वाहन घेऊन येत असल्याचे दिसून आले. सदर इसम थांबलेल्या ठिकाणी जवळ येताच पोनि/मोहिते यांनी सापळा पथकातील पोलीस अंमलदार यांना इशारा करुन सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या. तो इसम जवळ येताच पोनि मोहिते यांना बातमीतील हाच इसम असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी केलेल्या इशाऱ्यावरुन सापळा पथकातील अधीकारी व अंमलदार यांनी त्यास जागीच पकडले. 



त्यांनतर त्याचे नाव व पत्ता विचारता, त्याने त्याचे नांव सोहेल अमर मुलाणी (रा. खाटीक गल्ली, कुर्डूवाडी, ता. माढा.) असं असल्याचे सांगितले. पोलीस पथकाने सोहेल अमर मुलाणी याची अंगझडती घेतली असता, त्याच्या ताब्यात 63 ग्रॅम मेफेड्रोन (MD) हा 1,89,000 रुपये किंमतीचा अमली पदार्थ, गुन्हा करण्यासाठी वापरलेली होंडा कंपनीची BR -V ही चारचाकी वाहन आणि मोबाईल असे किंमत रूपये 8,00,000 रुपये असा एकूण 9,89,000 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 


या प्रकरणी सोहेल मुलाणी याच्याविरुद्ध कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस अॅक्ट 1985 कलम 8 क, 22 क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास न्यायालय समक्ष हजर केले असता, त्याची 24 सप्टेंबर रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे. कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि गटकुळ या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत. 

   ***

--- चौकट

.... यांनी पार पाडली कामगिरी

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. प्रेरणा कट्टे, सह.पोलीस अधिक्षक श्रीमती अंजना कृष्णा व्ही.एस. मॅडम (करमाळा उपविभाग), पोलीस निरीक्षक संजय जगताप (स्था. गु. शाखा), पोलीस निरीक्षक अतुल मोहिते (नेम. कुर्डुवाडी पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भिमगोंडा पाटील, सपोनि गटकुळ, पोलीस हवालदार सलीम बागवान, अजय भोसले, विजय भरले, पोकॉ सागर ढोरे-पाटील, प्रमोद शिंपाळे, किरण चव्हाण, अनवर अत्तार, चापोकॉ दिलीप थोरात तसेच कुर्डुवाडी पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार सुशांत शिंदे, संतोष मोरे, मपोहेकॉ फुलन कस्तुरे, पोकॉ समीर पठाण, चापोकॉ दत्तात्रय शिंदे यांनी पार पाडली.

To Top