जुगार अड्ड्यावर छापा; 36, 12, 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त

shivrajya patra


सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकानं जुगाराच्या अड्ड्यावर गुरुवारी, 17 सप्टेंबर रोजी टाकलेल्या  छाप्यात 21 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत आरोपींच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी वाहने, चारचाकी वाहने असा  36, 12, 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे सांगण्यात आलंय. 


पंढरपूर उपविभागाच्या अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे यांच्या पथकानं गुरुवारी सांगोला पोलीस ठाणे हद्दीत मौजे सोनंद इथं सुरु असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्डयावर छापा टाकला. या कारवाईत धनदांडग्या 21 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी वाहने, चारचाकी वाहने असा 36, 12, 120 (अक्षरी - रुपये छत्तीस लाख, बारा हजार, एकशे वीस फक्त) रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


या कारवाईत  21 आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 12 (अ) प्रमाणे  सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या कारवाईमुळं तालुक्यातील जुगारी वर्तुळात खळबळ माजली आहे.


सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे (पंढरपूर) यांच्या पथकाकडून करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

****

ग्रामीण पोलिसांचं आवाहन !

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून अवैध जुगार, मटका आणि इतर बेकादेशीर कृत्यावर अशाच पद्धतीने सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. अशा अवैध धंद्याबाबत नागरीकांनी माहिती देऊन पोलीसांना सहकार्य करावं, असं आवाहन सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

---

To Top