मोहोळ तालुक्याच्या विकास कामांसाठी भाजपा सदैव कटिबद्ध : माजी आमदार राजन पाटील

shivrajya patra

मोहोळ/प्रतिनिधी : भाजपा केवळ आश्वासने देत नाही, तर दिलेली आश्वासने प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत असते. अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी होती, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांच्या प्रयत्नातून हे काम मार्गी लागले आहे. भाजपा मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे मत यावेळी माजी आमदार राजन पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.

तालुक्यातील वाघोली-जामगांव रस्त्याच्या खडीकरण व मुरुमीकरण कामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

निवडणुकीच्या दरम्यान अनेक नागरिकांच्या समस्या होत्या, भारतीय जनता पार्टी ही संवेदनशील आहे, अनेक वर्षाच्या कामाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वामुळे मुहूर्त मिळाला. आगामी काळातही जनसेवेच्या कामात भाजपा नेहमी पुढे असेल, असे मत भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी बोलताना व्यक्त केले.

याप्रसंगी मोहोळ पंचायत समिती सभापती  अस्लम चौधरी, कुरुल जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव, प्रमोद आवताडे, हेमंत गरड, माजी सरपंच मुकुंद पाटील, महादेव गावडे, पवन वाघमारे, संजय पाटील, तानाजी पवार, विजय गावडे, तानाजी फाळके, म्हाळप्पा कोळेकर, तुळशीराम कोळेकर, राजेंद्र वाघमारे, सचिन बळवंतराव, रामेश्वर पतंगराव, रघू होनराव, सोन्याप्पा गावडे, सुधीर होनराव, बसू गिराम, अजित हरणे, सोमनाथ गावडे, सागर कोळेकर, सिद्धेश्वर गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

To Top