सोलापूर : येथील सोशल महाविद्यालय उर्दू पीएचडी संशोधन केंद्राने आणखी एक उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी नोंदवली आहे. उर्दू विषयातील सय्यद अब्दुल हन्नान बिलालोदीन (छ्त्रपती संभाजीनगर ) " शाह हुसेन नहरी:शख्सीयत और शायरी " आणि आसीफ अ. रहीम (जालना) " उर्दू ज़बान व अदब के फरोग मे इन्फॉरमेशन कम्युनिकेशन टेकनॉलॉजी " या दोन विषयावर दोन संशोधकांनी पीएचडी ची पदवी संपादन करून आपल्या संशोधनाचा शैक्षणिक प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. या यशाप्रित्यर्थ दोन्ही संशोधकांचा सत्कार करून उभयतांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्र. प्राचार्य तथा वायवाचे अध्यक्ष डॉ. ई. जा.तांबोळी, व प्रमुख पाहुणे डॉ. तय्यब अली खरादी (चेन्नई), डॉ. अब्दुलरब उस्ताद (कलबुर्गी) आणि डॉ. अ. कदीर बिजापुरे यांनी दोन्ही संशोधकांना पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल यथोचित सत्कार करून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. शफी चोबदार यांनी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, उपकुलगुरु डॉ. लक्ष्मीकात दायमा, वायवाचे अध्यक्ष डॉ. तांबोळी यांचे आभार मानत यापुढे ही असाच सहकार्य लाभेल, अशी आशा व्यक्त केली.
