सोलापूर : आषाढी पंढरपूर वारी- २०२६ शांततापूर्ण, सुरक्षित आणि अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रशासनिक कामगिरीबद्दल पत्रकार कृती समिती, सोलापूरच्या वतीने अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे अंबादास गज्जम, अशोक ढोणे, अक्षय बबलाद, अमोल कुलकर्णी, डॉ.राम हुंडारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एस कार्तिकेन यांचा शाल, मानाची टोपी व विठू रखुमाईचे फोटो फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाने वारकरी, नागरिक आणि विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधत वारीचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केलं. 
आषाढी वारी काळात सुरक्षा, वाहतूक, आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी तसेच इतर मूलभूत सुविधांचे प्रभावी नियोजन केल्यामुळे लाखो वारकऱ्यांना कोणतीही अडचण न येता दर्शनाचा लाभ घेता आला, असंही मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सत्काराबद्दल पत्रकार कृती समितीचे आभार मानत, या यशामागे जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचं तसेच पत्रकार बांधवांचे देखील विशेष मोलाचे सहकार्य असल्याचे सांगितले.
याप्रसंगी पत्रकार कृती समितीचे मिलिंद प्रक्षाळे, गिरमल्ला गुरव, अस्लम नदाफ, नितीन करजोळे, सिद्धार्थ भडकुंबे यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते.
