सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळगाव असलेल्या मराठा समाज विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ

shivrajya patra

मुंबई (पी. डी. पाटील) :  सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई,  यांच्या वतीने, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुळगाव असलेली  व मराठा ज्ञातीतील ज्या मुलां/मुलींनी मुंबई शहर व उपनगर परिसरातील शाळा-कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना शैक्षणिक वर्ष 2025-26 या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी, इ. 10 वी च्या परीक्षेत 80 टक्के, 12 वीत 75 टक्के (विज्ञान व वाणिज्य शाखा), 70  टक्के (कला शाखा)  व त्याहून अधिक गुण संपादन केले आहेत, विविध शाखेतील पदविका, पदवी व उच्च पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थांना, संस्थेच्या वार्षिक स्नेह-संमेलनात रोख रक्कमेची पारितोषिके, सन्मान चिन्हे, प्रशस्तीपत्रके देऊन गौरव करण्यात  येणार आहे.

तरी वरीलप्रमाणे यश संपादन केलेल्या विद्यार्थांनी आपल्या गुण पत्रिकेची छायांकित प्रत, संपूर्ण नाव, मुंबईतील पत्ता, गावचा  पत्ता, टेलीफोन क्रमांक/मोबाईल क्रमांक मराठीमध्ये दि. 30 सप्टेंबर 2026 पूर्वी, सावंतवाडी संस्थान मराठा समाज,मुंबई,  स्टार मॉल, 03 रा  मजला, न. चिं. केळकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई- 400028 या पत्त्यावर पाठवावीत. अधिक माहितीसाठी (सोमवार सोडून) बाळा पाताडे - 9137469348( सायं. 03 ते 06) यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आलं आहे.

To Top