दिवंगत दत्ता लक्ष्मण खंदारे यांच्या खून प्रकरणाची अक्कलकोट एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 926/2020 अन्वये नोंद झाली आहे. या गुन्ह्याची नोंद अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत करण्यात आली असून, या प्रकरणी पात्र वारसदारांचा शोध घेण्यात येत आहे. चौकशीअंती अद्याप वारसदारांची माहिती प्राप्त झालेली नाही.
त्यामुळे दिवंगत दत्ता लक्ष्मण खंदारे यांची पत्नी, अपत्ये वा अन्य कोणी कायदेशीर वारसदार असल्यास त्यांनी या जाहीर प्रकटनाच्या प्रसिद्धीपासून 15 दिवसांच्या आत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तिसरा मजला, सात रस्ता, सोलापूर येथे संपर्क साधून आपले वारसत्व सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करावीत.
यामध्ये वारस प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म दाखला, रेशन कार्ड तसेच इतर संबंधित पुरावे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण) सुलोचना सोनवणे यांनी केलं आहे.
निर्धारित मुदतीत कोणतीही हरकत, दावा अथवा वारसत्वाबाबतची माहिती प्राप्त न झाल्यास उपलब्ध अभिलेखांच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्यानंतर करण्यात येणारे कोणतेही दावे अथवा हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
