अवैध शस्त्र विक्री-खरेदी प्रकरणात सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी; ०३ राज्यातील ०६ आरोपी कोठडीत

shivrajya patra

परीते येथील विकास वजाळे याला ताब्यात घेण्यापासून घटनाक्रमात १७ पिस्टल आणि ४७ जीवंत काडतुसे हस्तगत  

वजाळे याच्याकडील नेक्सॉन कारसह १८, ४७,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 

पोलीस हाती न लागलेल्या आरोपींच्या शोधात

सोलापूर : ग्रामीण पोलिसांनी विना परवाना अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या ०६ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन १०,४७,००० रुपये किंमतीची १७ अग्निशस्त्रे, ४७ जिवंत कॉडतुसे आणि ८ लाख रुपये किंमतीची टाटा नेक्सॉन कार असा एकूण १८,४७,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. माढा, सांगली, पंढरपूर, सांगोला, बेळगांव (कर्नाटक), बडवानी (मध्यप्रदेश) येथील आरोपींचा अवैध शस्त्र विक्री-खरेदीशी संबंध असून अटकेतील आरोपींना न्यायालयानं, २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

गुन्ह्याची अधिक माहिती अशी की, १४ ऑगस्ट रोजी अकलुज पोलीस ठाणेचे पोलीस हवालदार श्रीराम पोरे यांना गोपनीय बातमीदारांकडून, माढा तालुक्यातील परीते येथील विकास कैलास वजाळे त्याच्याकडील टाटा कंपनीची नेक्सॉन कार (एम एच ४५/ एई ७००२) मधून विनापरवाना, बेकायदेशीर देशी बनावटीचा कट्टा विक्रीसाठी अकलुज-टेंभुर्णी रोडवर पतंगे मटन हॉटेल, संगम येथे दुपारी ३.०० वाचे सुमारास येणार असल्याबाबत माहिती मिळाली. 

त्याचे वर्णन काळे सावळे रंगाचा, त्याच्या चेहऱ्याचे डावे बाजुस कोड असलेला, अंगावर पांढरा फुल बाहीचा शर्ट व राखाडी रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला असल्याची माहिती बातमीदाराने हवालदार पोरे यांना दिली  होती. ही माहिती पोहेकॉ पोरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके (अकलुज उपविभाग, अकलुज) आणि पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांना कळविली. 

त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांनी ही माहिती वरीष्ठांना कळविली. अकलुज पोलीस ठाणे कडील पोउपनि विशाल कदम तसेच पोहेकॉ/१५८९ शिवकुमार मदभावी, पोकॉ/५१ जगताप, पोकॉ/७११ माने-देशमुख तसेच नियंत्रण कक्षाकडील पोहेकॉ/१६५९ अनिल शिंदे, पोहेकॉ/३९६ सुरज हेंबाडे, सपोफौ कदम, पोहेकॉ/११४ स्वप्निल गायकवाड यांचे पथक तयार केले.

या पथकास  १४ ऑगस्ट रोजी विकास वजाळे हा ०२ पिस्टल, ०४ जिवंत काडतूसे व वाहनासह मिळून आला. आरोपीने जिल्ह्यामत शस्त्रबंदीचा आदेश लागू असताना त्यांचा भंग करून, त्याच्या कब्जात एकूण ०२ पिस्टल, ०४ जीवंत काडतूसे व वाहनासह बेकायदा बिगर परवाना बाळगलेले स्थितीत ९, २४, ००० रुपयांचा मालासह मिळून आले आहेत. 

हे सर्व पिस्टल, जीवंत काडतूसे राहुल सतिश माने रा. मिरज जि. सांगली याच्याकडून विक्रीकरीता विकत घेतलेली आहेत. म्हणून आरोपी विकास कैलास वजाळे आणि राहुल सतिश माने (रा. मिरज) या दोघांविरुध्द भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, ५, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३),१३५ प्रमाणे सरकारतर्फे पोहेकॉ/१५८९ शिवकुमार मदभावी यांनी फिर्याद दिली.

या गुन्ह्यातील अटक आरोपी नामे विकास कैलास वजाळे याचेकडे ही पिस्टल (अग्निशस्त्रे), जीवंत काडतूस हे कोठून आणले, याबाबत तपास करता, त्याने त्याचा साथिदार राहुल माने याचे सोबत मोठ्या प्रमाणात पिस्टल (अग्निशस्त्रे) आणि जीवंत काडतूसं ही त्यांना अनिल पंचलाल मेहता (रा. बडवाणी) याचेकडून विक्रीसाठी आणून ते माढा तालुक्यातील अकोले, पंढरपूर तालुक्यातील करकंब, सांगोला तालुक्यातील चिक महुद), सांगली जिल्ह्यातील मिरज तसेच इतर गावातील इसमांना विक्री केल्याचे सांगितले.

विकास वजाळे याच्याकडे ही पिस्टल आणि जीवंत काडतूसं विक्री केलेल्या इसमांची माहिती विचारता, त्याने शनि भारत बनसोडे (रा. अकोले खु".) यास ०१ पिस्टल व ०२ जीवंत काडतूसे, महादेव बाळासाहेब कोरके (रा. कोरकेवस्ती, करकंब.) यास यास ०१ पिस्टल व ०२ जीवंत काडतूसे, प्रदिप पांडुरंग माने (रा. चिकमहुद) यास ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे, विजय सदाशिव किरणगी (रा. शिवणुर, ता. अथणी) यांस ०१ पिस्टल आणि ०२ जीवंत काडतूसे, सुमित नाना लवटे (रा. भुईटे वस्ती, सांगोला) यास ०१ पिस्टल आणि ०२ जीवंत काडतूसे विक्री केल्याचे सांगितले. 

त्याप्रमाणे आरोपी महादेव बाळासाहेब कोरके यास ताब्यात घेऊन त्याच्याकडुन ०१ पिस्टल आणि व ०२ जीवंत काडतूसे जप्त करण्यात आली. आरोपी विजय सदाशिव किरणगी (राज्य कर्नाटक) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ०१ पिस्टल आणि ०२ जीवंत काडतूसं जप्त करण्यात आली. 

चिकमहुद येथील प्रदिप माने याच्या घराची झडती घेऊन त्या घरातून ०१ पिस्टलसह ०२ जीवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली, त्याच बरोबर शनी बनसोडे रा अकोले (खु.II) याची घरझडती घेऊन त्याच्या घरातुन ०१ पिस्टल  आणि ०२ जीवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली.

या गुन्ह्याच्या तपासात अटकेतील आरोपी विकास वजाळे याने गुन्ह्यातील अग्निशस्त्रे धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे अनिल पंचलाल मेहता (मध्यप्रदेश) हा १६ ऑगस्ट रोजी अग्निशस्त्र देण्यास येणार असल्याची माहिती सांगून वर्णन आणि त्याचा फोटो दाखविला. 

त्याप्रमाणे १५ ऑगस्ट रोजी अकलुज पोलीस ठाण्याकडील सपोनिअंकुश वाघमोडे, पोहेकॉ शिवकुमार मदभावी, राहुल रणनवरे, पोहेकॉ अनिल शिंदे, स्वप्नील गायकवाड, पोकॉ रणजित जगताप यांचं पथक तयार करुन ते सोनगीर येथे जाऊन आरोपी विकास वजाळे याने दिलेली माहिती आणि वर्णनाप्रमाणे एक इसम हातामध्ये एक पिशवी घेऊन सोनगीर, येथील एका बंद हॉटेलसमोर संशयितरित्या रोडवर फिरताना दिसून आला. त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडील ०४ अग्निशस्त्रे आणि २५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले.

हे पथक परतीच्या वाटेवर असताना, या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी राहूल माने हा टेंभुर्णी परिसरात असल्याची गोपनिय माहिती मिळाली. सपोनि अंकुश वाघमोडे आणि स्टाफ असे त्या ठिकाणी जाऊन शोथ घेतला असता, सोबतचा आरोपी अनिल पंचलाल मेहता याच्या मदतीने राहुल माने यास ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली.

या गुन्ह्यातील आरोपी राहुल माने, सांगली जिल्ह्यातील उमदी पोलीस ठाण्याकडील बी.एन.एस १०३, ३(५) सह भा. ह. अधि ३, २५ प्रमाणे दाखल गुन्ह्यात फरार आरोपी असल्याचंही निष्पन्न झालं आहे.

त्याचप्रमाणे या गुन्ह्याचे तपासामध्ये अटक आरोपी विकास वजाळे याच्याकडे तपास केला असता, त्यानं सांगोला तालुक्यातील भुईटे वस्ती येथील सुमित लवटे याला ०१ पिस्टल आणि ०२ जीवंत काडतूसे विक्री केल्याचे सांगितले. 

सपोनि विक्रम साळुंखे यांनी सुमितला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ०१ पिस्टल आणि ०२ जीवंत काडतूसे जप्त करण्यात आली. तसेच अटकेतील आरोपी राहुल माने याच्याकडे तपास केला असता, त्यानं ०६ पिस्टल (अग्निशस्त्रे) आणि ०८ जीवंत काडतूसे काढून दिल्याने जप्त करण्यात आली.

या अटक आरोपीकडं कोणत्याही प्रकारचा पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगण्याचा परवाना नसल्याही निदर्शनास आलं आहे. या गुन्ह्यात आरोपी विकास वजाळे, राहुल माने, महादेव बाळासाहेब कोरके, विजय सदाशिव किरणगी (जिल्हा बेळगाव), अनिल पंचलाल मेहता (मध्यप्रदेश) आणि सुमित लवटे या आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २१ ऑगस्ट रोजीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. प्रदिप पांडुरंग माने (रा. चिक महुद) आणि शनि भारत बनसोडे (रा. अकोले खुर्द) हे आरोपी सध्या फरारी आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम सांळुखे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे, शस्त्रे, शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या इसमांवर प्रभावी कारवाई करण्याची मोहिम चालू राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

.... चौकट 

..... हे आहेत आरोपी !

१) विकास कैलास वजाळे (वय-३१ वर्षे, रा. परीते ता. माढा)

२) राहुल सतिश माने (वय- ३४ वर्षे, रा. वसंतदादा हौंसिंग सोसायटी, माजी सैनिक वसाहत, मिरज जि. सांगली)

३) शनि भारत बनसोडे (रा. अकोले खुर्द, ता. माढा)

४) महादेव बाळासाहेब कोरके (वय-३० वर्षे रा. कोरके वस्ती, करकंब ता. पंढरपूर)

५) प्रदिप पांडुरंग माने (रा. चिक महुद ता. सांगोला)

६) विजय सदाशिव किरणगी (वय- ३४ वर्षे, रा. शिवणुर ता. आटणी जि. बेळगांव राज्य कर्नाटक)

७) अनिल पंचलाल मेहता (वय-३२ वर्षे, रा. रांजणगाव ता. वरला जि. बडवानी राज्य - मध्यप्रदेश)

८) सुमित नाना लवटे (वय-१९ वर्षे, रा. भुईटे वस्ती, सांगोला)

.... चौकट 

जप्त मुद्देमाल

 १०,००,००० रुपये किंमतीचे देशी बनावटीचे १७ पिस्टल 

 ४७,००० रुपये किंमतीचे ४७ जिवंत काडतुसे (राऊंड)

 ८,००,००० रूपये किंमतीची एक टाटा कंपनीची नेक्सॉन कार   (एमएच ४५/ए ई ७००२)

एकूण १८, ४७, ००० रुपये किंमतीचा जप्त मुद्देमाल

.... चौकट 

.... यांनी पार पाडली कामगिरी !

जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे (पंढरपूर विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके (अकलुज उपविभाग अकलुज) यांच्या मार्गदर्शनाखाली अकलुज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे, सहा. पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, सहा. पोलीस निरीक्षक अकुंश वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पोहेकॉ/१६२३ श्रीराम दिनेश पोरे, पोहेकॉ/१५८९ शिवकुमार रेवाप्पा मदभावी, पोहेकॉ/२११ राहुल सुग्रीव रणनवरे, पोहेकॉ/९७८ अमोल मोहण बकाल, पोहेकॉ/१४०७ समीर लतीफ पठाण, पोना/११७७ दत्तात्रय पांडुरंग खरात, पोकॉ/५१ रणजित राजेंद्र जगताप, पोकॉ/७११ तुकाराम शिवाजी माने-देशमुख, पोकॉ/८७५ विजय शशिकांत तवटे, पोलीस अधीक्षक यांच्या पथकातील सपोफौ शरद कदम, पोहेकॉ/३९६ सुरज हेंबाडे, पोहेकॉ/१६५९ अनिल महादेव शिंदे, पोहेकॉ/११४ स्वप्नील गायकवाड, पोकॉ/प्रविण मेटकरी (सायबर पोलीस ठाणे).

To Top