साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती- 2026 अनुषंगाने पार पडली शांतता कमिटीची बैठक
सोलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती - 2026 च्या अनुषंगाने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंगळवारी, 28 जुलै रोजी सायंकाळी पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगर पालिकेकडील अधिकारी, धर्मादाय युक्त कार्यालयाकडील अधिकारी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाचे पदाधिकारी, आणि सदस्यांची पोलीस आयुक्तालयात संयुक्तपणे बैठक आयोजित केली होती.
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती डॉ. अश्विनी पाटील यांनी या बैठकीची प्रस्तावना करुन बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य आणि इतरांनी समस्या/सुचना मांडल्या. त्यानंतर त्या सूचनेचे संबंधित महानगरपालिका, महावितरण, आर. टी. ओ., धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी सदर कामाची रुपरेषा बघून समस्या सोडविण्यात येतील, असं सांगितले. पोलीस आयुक्त एम राज कुमार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
या बैठकीस पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) श्रीमती वृष्टी जैन, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) प्रितम यावलकर, सहा. पोलीस आयुक्त (विभाग-02) श्रीमती कुर्री मॅडम, सहा. पोलीस आयुक्त (शहर वाहतूक शाखा) खिरडकर, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) दिलीप पवार, सहा पोलीस आयुक्त (नियंत्रण कक्ष) यादव, 
सहा. पोलीस आयुक्त देवकर (विशेष शाखा), सोलापूर महानगरपालिका कडील श्रीमती एस. ए. हिबारे, महावितरण अभियंता गायडे, सोलापूर अग्नीशामक दलाचे समीर पाटील, धर्मादाय आयुक्त कार्यालयकडील उमेश देशमुख तसेच सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार, शांतता कमिटीचे सदस्य आणि पत्रकार बंधु उपस्थित होते.
***
... चौकट
... कायदा हातात घेऊ नये, अन्यथा कारवाई अटळ : एम राज कुमार
पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी प्रारंभी बैठकीस उपस्थित नागरिकांचं स्वागत करुन मांडलेल्या अडी-अडचणीचे निरसण केले.
उत्सव साजरा करताना बऱ्याचवेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते, कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, शांतता समिती सदस्य व नागरीकांनी आपल्या परीसरातील बेकायेदशीर बाबींची माहिती पोलीसांना दिली पाहिजे.
मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नये, नियमांचे पालन करावे, नियमांचे पालन नाही झाले तर कायदेशीर कारवाई होईल. शासनाने नेमून दिलेल्या सुचना पाळल्या पाहिजेत. तसेच योग्य तो बंदोबस्त नेमू, असे सांगून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन बैठकीला उपस्थितांचे आभार मानले.
... चौकट
मंडळांनी ऑनलाईन-ऑफलाईन पध्दतीने परवानगी घेणे बंधनकारक
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव-2026 मंडळांनी ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने परवानगी घेणे बंधनकारक आहे, याची नोंद घ्यावी. ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीकरीता प्रत्येक पोलीस ठाणे येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.
... चौकट
पारंपारीक वाद्ये,आरोग्यविषयक आणि सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास द्यावी पसंदी
01 ते 09 ऑगस्ट 2026 रोजी पर्यंतचे कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव- 2026 साजरी करण्यात येणार आहे. 09 ऑगस्ट रोजी मिरवणुकीमध्ये पारंपारीक वाद्य वाजविणेबाबत सूचना देण्यात आल्या. उत्सव काळात सर्व मंडळानी सीसीटीव्ही कॅमेरेंची व्यवस्था करावी, मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा 2/3 भाग मोकळा सोडावा. 
मोकाट जनावरांपासुन मुर्ती/फोटोस धोका होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत, उत्सवाचं पावित्र्य राखावे, मंडळांकडून जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंदी द्यावी. तसेच स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर गुन्हेगारी यंत्रणाबाबत जनजागृती करावी.
सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनीप्रदुषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. मंडाळांनी महावितरण विभागाकडुन अधिकृत विद्युत जोडणी करुन घ्यावी जेणेकरुन मंडपामध्ये शॉर्टसर्कीट होवून इजा अथवा धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व मंडळांनी मिरवणुकीत सामिल होणाऱ्या वाहनांची आर टी. ओ. कडून तपासणी करावी.
मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरु नये, वाहनांवरील देखाव्यांची उंची अडथळा होणारी नसावी. मिरवणुक संवेदनशिल ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेऊ नये. अन्य धर्मांच्या भावना दुखावणार नाही, यांची काटेकोर दक्षता घ्यावी.
मंडळाने स्थापन केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती यांचे मुर्तीसमोर स्वयंसेवक सतत हजर राहतील आणि मुर्तीची देखभाल करतील, याची पुरेपुर काळजी घ्यावी. सोशल मिडीयावरुन काही अक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरीत पोलीस यंत्रणेस कळवावे, असंही यावेळी सुचित करण्यात आले.
