पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्र परिवाराकडून पार पडला अस्लम नदाफ, प्रवीण पारवे आणि आरटीआय कार्यकर्ते बापू ताज पटेल यांचा सत्कार सोहळा

shivrajya patra

सोलापूर : जिल्हा परिषद येथील बागेत बुधवारी, दुपारी पत्रकार कृती समितीचे सदस्य अस्लम नदाफ, प्रेस मीडिया न्यूजचे संपादक प्रवीण पारवे तसेच आरटीआय कार्यकर्ते बापू ताज पटेल यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन   बुधवारी करण्यात आलं होतं. उपस्थितांनी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तिसरी आँख मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्या पुढाकाराने ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी पत्रकार कृती समितीचे सदस्य अस्लम नदाफ, प्रेस मीडिया न्यूजचे संपादक प्रवीण पारवे तसेच आरटीआय कार्यकर्ते बापू ताज पटेल यांना शाल, टोपी व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. 

त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि समाजहिताच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास अप्पासाहेब लंगोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नितीन करजोळे, लतीफ नदाफ, मिलिंद प्रक्षाळे, सिद्धाराम नंदरगी, गिरमल्ला गुरव, अक्षय बबलाद, डॉ. राम हुंडारे, सिद्धार्थ भंडकुबे, रविंद्र जाधव, सिद्धू पुजारी, सुरज रजपूत, जहिर नदाफ, फिरोज पटेल, मंथन लकडे, महिबूब सोमजाळ, कुणाल भिसे यांच्यासह अनेक पत्रकार बांधव, आरटीआय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच अप्पाश्री मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्तींच्या जनहिताच्या कार्याचा गौरव करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. संपूर्ण सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

***

To Top