पुस्तक प्रकाशन, पुस्तकांवर चर्चा आणि पार पडले कवी संमेलन
अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य परिषदेचा उपक्रम
सोलापूर : आपली राज्य मराठी भाषा समृद्ध आहे, त्यात पूर्वीपासून अनेक मुस्लिम साहित्यिकांनी मराठी साहित्यात आजतागायत मोलाची भर घालती आहे, ही बाब समाधानाची असली तरी साहित्यातील कथा-कादंबरीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. कवितेच्या विविध प्रकारचं लिखाण भरपूर होत आहे, तसंच समाजाच्या वेदना, व्यथा आपल्या साहित्यात ठळकपणे यायला हवे, अशी अपेक्षा प्रा. दस्तगीर जमादार यांनी अ, भा. मुस्लीम मराठी साहित्य परिषद आयोजित " पुस्तकावर बोलू या " या उपक्रमांतर्गत आपले मत व्यक्त केले.
सोशल महाविद्यालयात रविवारी झालेल्या पुस्तकांवर बोलू " ह्या कार्यक्रमाची सुरुवात कुरण पठणने झाली. प्रास्ताविकेत सचिव अय्यूब अहमद नल्लामंदू यांनी कार्यक्रमाचे हेतू विषद करत सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. इ. जा. तांबोळी, प्राचार्य शकील शेख, खजीनदार हसीब नदाफ, मुबारक शेख, इक्बाल बागबान, मजहर अत्लोळी यांनी पाहुण्यांचा शाल, बुके, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. यानंतर अनिसा शेख (दौंड) लिखित " काव्य सप्तक " हा काव्य संग्रहाचं सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यानंतर थेट चर्चेला सुरुवात झाली. ' श्यामचा बाप ' या कादंबरीवर भाष्य करताना कवी खाजा बशीर बागबान म्हणाले- व्यसनाधीनतेमुळे उद्धवस्त होणारे आईचे अथक परिश्रम, शिक्षणासाठी संघर्ष करणारा तरुण, जाती धर्माचा भेदभावामुळे होणारी उपेक्षा आणि मातृत्वाच्या त्यागातून उभे राहणारे जीवन हे सर्व घटक वाचकाला विचार प्रवृत्त करतात. ही कादंबरी समाजातील दुर्लक्षित घटकांना आवाज देत ती वाचकाला अनेक प्रश्न विचारते, परंतु समाजाकडून अपेक्षित असलेले उत्तर सापडत नाही, याची खंत वाटते.
त्यानंतर डॉ. शकील शेख यांची "ज़ुबा " वर डॉ. सुरैय्या परवीन जहागीरदार आपले विचार मांडताना म्हणाले- 'जुबा ' उपेक्षितांच्या आवाजाचे प्रतिनिधीत्व करणारी व इतिहातील कटू सत्य उघड करणारी सामाजिक दस्तऐवज आहे, व भविष्यातील संघर्षीच्या काळात धर्म, सत्ता, आणि द्वेषाच्या पलीकडे जाऊन शेवटी "मानवता" हाच सर्वोच्च मूल्य आहे, असा संदेश देणारी आहे.
शेवटी कवी मुबारक शेख रचित काव्य संग्रह " अजान आणि चालिसा " या वर प्रा. बी. एच. करजगीकर म्हणाले- अज़ान अणि चालिसा ही सोप्या सरळ भाषेतील काव्य संग्रह असले तरी त्यात मांडलेले विषय मात्र गंभीर दिसतात
समाजातील गरीबी, दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, तसेच झोपड़ीत राहूनसुद्धा महलच्या स्वप्नापर्यंत मजल मारणारी माणसाची सत्यता दर्शविते, पुन्हा चर्चेत असलेल्या चेहरे साहिर लुधियानवी, उस्ताद बिस्मिल्लाह खान, बेगम हजरत महल, फातिमाबी शेख, मीना कुमारी, चित्रकार मकबूल फिदा हुसेन सारख्या व्यक्तिंना सुद्धा आपल्या कवितेत सामील करून नवीन पिढीला " रु - ब - रु " करण्याचा मुबारक शेख यांचा प्रामाणिक प्रयत्न फार सुंदर दिसतो. प्रा. महंमद शेख यांनी सुत्र संचालन केले तर हसीब नदाफ यांनी पहिल्या सत्राच्या अखेरीस आभार मानले.
दुपारच्या दुसऱ्या सत्रात अतिसा शेख (दोंड) यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाची सुरुवात झाली. यात राज्यभरातून आलेल्या कवी व कवियित्रींनी आपल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विषयावरील कविता ' गझल सादर करून सर्वांची दाद मिळविली. सर्व कवींना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्प देऊन कवी ॲड .हाषम पटेल, हमीद शेख, कमलाकर सावंत (औसा), सिकंदर मुजावर (मोहोळ), पठाण गुरुजी, फारूक काझी, नूरजहां कोरबू, डॉ. नसरीन बागबान (मुळेगांव), डॉ. सुरैय्या परवीन, प्रा. अनिसा शेख, प्रा. अय्यूब अहमद, मुबारक शेख, खाजा बागबान (पुणे), सफुरा तांबोळी, जाकीर त्रांबोळी, गौस शेख, अ. करीम सय्यद, इस्माईल शेख, प्रा. बी. एच. करजगीकर, सुमय्या चौधरी, हाफीजा बागबान, जावीद शेख, अमीर पटेल, तहसीन सय्यद, यु. एफ. जानराव, बशीर तांबोळी, शाहीन सुलताना, जमालोदीन शेख, नूरजहां यांना सन्मानित करण्यात आले. तहसीन सय्यद (लातूर) यांनी सुरेख सुत्रसंचालन केले तर जाफर बांगी यांनी आभार मानले.
यावेळी ॲड. हाषम पटेल (लातूर), फखरोदीन शेख (अकलूज), इलीयास सिद्दीकी, प्रा. आफताब मुल्ला, इक्बाल बागबान, नाना गव्हाण, अबुबकर नल्लामंदू, हमीद शेख, हुसेन नदाफ, करीम सय्यद, शब्बीर जमादार आणि फय्याज शेख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
..... चौकट ......
डॉ. इ. जा. तांबोळी आणि कवी मुबारक शेख यांच्या साहित्य सेवेमुळे मराठी साहित्यात मोलाची भर : डॉ. शकील शेख
डॉ. इ. जा. तांबोळी यांनी आपल्या कादंबऱ्याच्या माध्यमातून व कवी मुबारक शेख हे कवितेच्या माध्यमातून जी साहित्य सेवा केली आहे, ते गौरवशाली आहे त्यांच्या या पुस्तकांमुळे मुस्लीम मराठी साहित्यात मोलाची भर पडली आहे, असं मत डॉ. शकील शेख यांनी अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.
