परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटल्यात पुराव्याची शृंखला परिपूर्ण असणं महत्वाचं ! न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल; आरोपी पती-पत्नी निर्दोष

shivrajya patra

सोलापूर : परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची शृंखला परिपूर्ण असणे महत्वाचे असते, असं मत व्यक्त करुन तब्बल अडीच वर्षापासून कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले आरोपी संजयसिंह रतनसिंह आणि त्याची पत्नी नितु संजयसिंह यांची सोलापूर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

मोहोळ तालुक्यातील कोण्हेरी येथील हॉटेलमध्ये संजयसिंह रतनसिंह व त्यांची पत्नी कामास होते. त्याच हॉटेलमध्ये कामास आलेल्या उत्तर प्रदेशमधीलच संतोषसिंग याच्याबरोबर भांडण झाल्याने पती-पत्नीनं,  20  मार्च 

2024 रोजी संतोषसिंग याचा नॉयलॉन दोरीने गळा आवळून खून केला, असं सरकार पक्षाचे म्हणणं होतं. 

आरोपीविरुध्द सादर करण्यात आलेल्या  परिस्थितीजन्य पुराव्याची कडी परिपूर्ण नाही. अशा खटल्यातील घटना शाबितीबद्दलच्या सर्वोच्च न्यायालयाने शरद सारडा वि. महाराष्ट्र सरकार या खटल्यातील निकाल पत्रात नमूद केलेल्या पंचशिल तत्वाच्या निकषात बसत नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला होता.

या खटल्यात आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. प्रणित जाधव यांनी काम पाहिले.

To Top