कठिण परिश्रमाशिवाय उज्ज्वल यश प्राप्त होत नाही : उर्दू साहित्य अकादमी अध्यक्ष हसीन अख्तर

shivrajya patra

सोलापूर : सध्याच्या संगणकीय युगात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आपल्या ध्येय व उद्दीष्ठ समोर  ठेऊन खूप परिश्रम करावं लागते कठीण परिश्रम केल्यास त्यांना यश नक्कीच मिळतो ,असे मत महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीचे अध्यक्ष हसीन अख्तर यांनी व्यक्त केले.  

अखिल भारतीय उर्दू साहित्य परिषद सोलापूर तर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सभारंभात हसीन अख्तर अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. कार्यक्रमास डॉ. इस्माईल शेख यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. 

हसीन अख्तर पुढे म्हणाले की,  विद्यार्थ्यांचा पाठीवर  कौतुकाची थाप पडल्याने त्यांना प्रेरणा मिळते, उत्साह वाढतो, आनंद मिळतो आणि हा कौतुक सोहळा उर्दू परिषदने आयोजित केला, ते सुद्धा कौतुकास्पद आहे.

प्रमुख अतिथी म्हणुन बोलताना डॉ. इस्माईल शेख  म्हणाले की, उच्च शिक्षण हाच विद्यार्थ्याचा विकासाचा पाया असला तरी आपला  वय व वेळ आयुष्याची दिशा ठरवत असतो, म्हणून आपण चांगल्या पुस्तके वाचत वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. यावेळी परिषदेचे सदस्य हारून बंदुकवाला सेवानिवृत झाल्याने हसीन अख्तर यांच्या हस्ते विशेष सम्मान करण्यात आला.

उर्दू साहित्य परिषदेच्या वतीने शहरातील माध्यमिक शाळा तसेच ज्यु. कॉलेजमधील प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवुन उज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते स्मृति चिन्ह, प्रशस्तीपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रियाज वळसंगकर यांनी करुन संस्थेने केलेल्या कार्याची माहिती सादर केली.  माजी महापौर तथा संस्थेचे अध्यक्ष अॅड. यु. एन. बेरिया यांचे हस्ते प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शफी कैप्टन, रफीक नल्लामंदू, रफिक खान, जविद उस्ताद, अय्यूब अहमद नल्लामंदू आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सुत्र संचलन व पाहुण्यांचा परिचय  अशफाक सातखेड यांनी केले तर अय्यूब नल्लामंदू यांनी आभार मानले.

To Top