रॉयल्टी व्यतिरिक्त 01, 00, 000 लाख रुपये लाचेची मागणी

shivrajya patra

मंडल अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल

सोलापूर : शेतातील विहीर खोदकामातून निघालेल्या मुरूमाच्या वाहतुकीसाठी आणि वापराची परवानगी मिळण्याकरिता प्रकरणी मुरूमाची पाहणी करून सकारात्मक अहवाल देण्यासाठी 01, 00, 000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्यानं मंडल अधिकाऱ्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विजयकुमार माने असं लाचखोर मंडल अधिकाऱ्याचं नांव आहे. त्याच्याविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आलंय.

यातील तक्रारदार हे उदरनिर्वाहासाठी शेतीसोबत मुरूम वाहतुकीचा व्यवसाय करत असून, बेलाटी येथील विहिरीचा अजोरा वाहतुकीसाठी परवानगी मिळण्याकरिता तक्रारदाराने तहसीलदार उत्तर सोलापूर कार्यालयाकडे अर्ज दिला होता. तहसीलदारांकडे दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने, तहसीलदार, उत्तर सोलापूर यांनी तिऱ्हे येथील मंडल अधिकारी माने यांना स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

विहिरीचा अजोरा वाहतूक आणि वापर परवानगीसाठी सकारात्मक अहवाल देण्यासाठी मंडळ अधिकारी विजयकुमार माने यांनी तक्रारदाराकडे 01 लाख रुपयांची लाच रकमेची मागणी केली. त्यावर तक्रारदाराने सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रारी अर्ज दिला होता.

प्राप्त तक्रारीची पडताळणी 26 मे 2026 रोजी शासकीय पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली असून पडताळणी दरम्यान मंडल अधिकरी माने यांनी तक्रारदाराकडे रॉयल्टी व्यतिरिक्त 1, 00, 000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने, 27 मे 2026 रोजी कारवाई करण्यात आली.

त्याच्याविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा) यांच्याकडे या गुन्ह्याचा अधिक तपास सोपीनाथ आला असल्याचे सांगण्यात आले.

ही कारवाई शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक (एसीबी, पुणे. मो. क्र. 9823167154), अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील ( एसीबी, पुणे. मो.क्र 9029030530) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले
(एसीबी, सोलापूर मो.क्र. 9823225465), पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते, सपोफौ कोळी, पोलीस अंमलदार संतोष नरोटे, शिरीषकुमार सोनवणे, स्वामीराव जाधव, श्रीराम घुगे, सलीम मुल्ला, गजानन किणगी, रवी हाटखिळे, राजू पवार, अक्षय श्रीराम आणि अनुप दळवी (सर्व नेमणूक : एसीबी, सोलापूर.) यांनी पार पाडली.

नागरिकांना आवाहन !

लोकसेवक शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देणेसाठी कायदेशीर फी व्यतरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन श्री. प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, एसीबी सोलापूर. मो.क्र. 9823225465 यांनी केले आहे.

संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन चौक, सोलापूर.

संकेतस्थळ- www.acbmaharashtra.gov.in
ऑनलाईन तक्रार अॅप-acbmaharashtra.net टोल फ्री क्रमांक- 1064
दूरध्वनी क्रमांक- 0217- 2312668

व्हॉटसअॅप क्रमांक- 9404001064

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर,
प्रशांत चौगुले,
पोलीस उप अधीक्षक.


To Top