टीईटी परिक्षा विरोधात खा. प्रणिती शिंदे यांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन

shivrajya patra

धाराशिव : आर टी ई कायदा लागू होण्यापूर्वी जे शिक्षक बंधू-भगिनी सेवेत रुजू झाले आहेत, त्यांना या परिक्षेतून नैसर्गिक नियमाने सूट देण्यात आली पाहिजे, परंतु न्यायालयाने त्यात हस्तक्षेप न केल्याने पेच निर्माण झाला आहे. तो प्रश्न सोडविण्यासाठी लोकसभेच्या सभागृहात या कायद्यात दुरुस्ती होणे गरजेचे आहे, हे खासदार शिंदे यांच्या निदर्शनास आणून लोकसभेमध्ये या प्रश्नांसंदर्भात आवाज उठवावा, अशी विनंती धाराशिव अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने केली.

टिईटी परिक्षा ही देशातील सर्व शिक्षकवृंदांवर लादली गेली आहे.. ती अन्यायकारक असून शिक्षण व्यवस्था कोलमडली जाईल, अशी स्थिती संबंध देशात या परिक्षेमुळे निर्माण झाली आहे. 

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या टिईटी परिक्षेविरोधातील व्यापक आंदोलनाचा भाग आणि रणनितीनुसार लोकसभेच्या येत्या अधिवेशनात लोकप्रतिनिधीमार्फत प्रश्न मांडण्यासाठी म्हणून देशातील लोकसभा व राज्यसभे च्या सर्व खासदार यांना निवेदन देण्यात येणार आहे, त्याचाच भाग म्हणून धाराशिव अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर आणि जिल्हाध्यक्ष बशीर तांबोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खा. प्रणिती शिंदे यांची भेट घेतली.

खासदार शिंदे यांनी आपण नक्कीच आमच्या पक्षाच्या वरिष्ठांना यासंदर्भात प्रश्नाची गांभीर्य लक्षात आणून देऊन सामहिकरित्या याप्रश्नी सभागृहात आवाज उठवला जाईल, असे आश्वासन अखिल च्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी शिवाजी साखरे,  डी. आर. शेख, हाशम शेख, सोमनाथ केवटे, शेखू जेटीथोर, विठ्ठल जेटीथोर, ईलाही बागवान, पी. पी. शिंदे उपस्थित होते.

To Top