कोल्हापूर : २६ जून २०२६ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी कोल्हापुरात नियोजित " शाक्य संघ ," सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बिगुल वाद्य वाजवून मानवंदना देण्यात येणार आहे. या सोहळ्यात राज्यभरातून १०० हून अधिक " शाक्य संघ ," चे सदस्य विशेष ड्रेसकोडमध्ये मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहणार असून त्यामध्ये सोलापूर , कोल्हापूर , सांगली , ठाणे, पुणे , दौंड, संभाजीनगर , बीड वगैरे जिल्ह्यातून " शाक्य संघ ," महाराष्ट्र मधील सदस्य उपस्थित राहणार आहेत यावेळी राजर्षींच्या जयंतीनिमित्ताने खाऊ वाटपही करण्यात येणार आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी, २६ जून रोजी कोल्हापूर येथील दसरा चौकात शासकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन प्रमुख पाहुणे लोकसभेचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभहस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार पुष्पहार अर्पण करून नियोजित "शाक्य संघ ," सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य व " शाक्य संघ ," माता रमाई ," महिला ब्रिगेड पोलीस पत्नी सामाजिक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष ड्रेस कोड मध्ये बिगुल वाजवून छत्रपती शाहू महाराजांना प्रमुख अतिथीच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात येणार आहे.
राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांची जयंती दिवाळी सणाप्रमाणे साजरी करा, असं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते, त्या अनुषंगाने खारीचा वाटा म्हणून त्या ठिकाणी प्रमुख मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते संस्थेच्या वतीने मिठाई वाटपाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे.
याप्रसंगी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, वसंतराव मुळीक, संजय कांबळे, बबनराव रानगे(राजर्षी शाहू सलोखा विचार मंच, कोल्हापूर.) विविध सामाजिक संस्था व शाळेतील मुले व मुली हजर राहणार आहेत.
छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर येथे मानवंदनेचा कार्यक्रम संस्थेच्या वतीने दुसऱ्यांदा होत आहे. यापुढेही प्रत्येक वर्षी महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर येथे मानवंदना देण्याचा कार्यक्रम चालू ठेवण्याचा संस्थेचा मानस आहे.
या मानवंदना सोहळ्यास 100 अधिक सदस्य उपस्थित राहणार असुन सदरील कार्यक्रमाचे नियोजन अशोककुमार दिलपाक (नियोजित शाक्य संघ , संघटक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य) अरुण ओहळ (अध्यक्ष - "शाक्य ," मिलिंद संघ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संस्था दौंड, जिल्हा पुणे.), सुभाष सर्वगोड (अध्यक्ष - शाक्य संघ ," शौर्य विजयस्तंभ पुणे ) गोविंद जगताप ( सचिव " शाक्यसंघ " शौर्य विजयस्तंभ, पुणे.), कल्याण भंडारे ( सचिव - "शाक्य संघ ," सम्राट अशोका बीड.), अंकुश पंडित, निवॄती सुरडकर (नियोजित- शाक्य संघ , माता सावित्रीमाई फुले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संस्था संभाजीनगर.) प्रकाश सावंत ( "शाक्य संघ,' शौर्य विजयस्तंभ, पुणे.) यांनी केले असून आहे.सदरिल कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर येथुन निवृत्ती सुरडकर, अंकुश पंडित, अनिल तांदळे, एकनाथ वारे, रामदास खाजेकर, दादाराव खरे सर, मनोहर जमदाडे, कडुबा वाहुळ, धनराज गडलींगे इत्यादी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कर्मचारी कोल्हापूर येथे जाणार आहेत .
*****
