कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती दिनी, 26 जून रोजी कोल्हापुरात जन्मस्थळ आणि दसरा चौकात खासदार छत्रपती शाहू महाराज, जिल्हाधिकारी डॉ . विजय राठोड (कोल्हापूर), महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भारूड (कोल्हापूर) वसंतराव मुळीक (मराठा सेवा संघ) यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुष्पहार अर्पण केला. यावेळी नियोजित " शाक्य संघ ," सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी महाराष्ट्र राज्य व नियोजित" शाक्य संघ ," माता रमाई महिला ब्रिगेड सेवानिवृत्त महिला पोलीस अधिकारी-कर्मचारी, पोलीस पत्नी यांनी विशेष ड्रेस कोडमध्ये दोन्ही ठिकाणी बिगुल वाजवून मानवंदना दिली. 
आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय लोकशाहीचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा देऊन ठिकाणचा परिसर दणाणून सोडला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दिवाळी सणाप्रमाणे साजरी करा. या विधानाला अनुसरून नियोजित " शाक्य संघ , सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य व नियोजित शाक्य संघ, 
माता रमाई महिला ब्रिगेड सेवानिवृत्त महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी व पोलीस पत्नी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विद्यार्थी-विद्यार्थीनींना तसेच नागरिकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मिठाई (2हजार लाडू) वाटण्यात आली. राजर्षींचा जयंतीदिवस मिठाई वाटपानं दिवाळी प्रमाणं आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सोलापूर, ठाणे, पुणे, दौंड, छत्रपती संभाजीनगर, बीड, उल्हासनगर येथून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी राजर्षींना मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. कार्यक्रमास नियोजित-शाक्य संघ, संघटक महाराष्ट्र राज्य चे संघटक अशोककुमार दिलपाक,
आयु अरूण ओहळ. (अध्यक्ष-शाक्य संघ," मिलिंद, दौंड.), राजू नाईकनवरे, नारायण गायकवाड (दौंड ), सुभाष सर्वगोड (अध्यक्ष- शाक्य संघ, शौर्य विजयस्तंभ, पुणे.), गोविंद जगताप, प्रकाश सावंत, 
अरुण गायकवाड, महादेव आठवले, माणिकराव भोसले, मिलिंद ठोसर, राजेंद्र कांबळे, बाबासाहेब माने, रमेश शिंदे, महेंद्र रणधीर (सर्व पुणे), अंकुश पंडित, निवृत्ती सुरडकर, अनिल तांदळे, दादाराव खरे, मनोज जमदाडे, रामदास खांजेकर (छत्रपती संभाजीनगर),
कल्याण भंडारे वगैरे (बीड), गिरीश उबाळे (सोलापूर), छबुताई काळबाडे (नागपूर), छाया गायकवाड (ठाणे), दुर्गा गवई, शकुंतला गायकवाड, कुसुम वाघमारे, जयश्री आठवले, सुनिता सावंत, सुनंदा ठोसर वगैरे (सर्व पुणे), रत्नप्रभा भंडारे वगैरे (बीड)
*****
... चौकट
ऐतिहासीक दसरा चौकात २,००० लाडू वाटप !
राजर्षी शाहू महाराज जयंती दिनी ऐतिहासीक दसरा चौकात खासदार छ्त्रपती शाहू महाराज आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते २००० लाडू मिठाई वाटपानं " शाक्य संघ ," सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेनं प्रथमच आनंदोत्सव साजरा केला.
... चौकट
... यांचा होता मिठाई वाटपात सहभाग !
आयु. छबु काळबांडे- नागपूर (५० किलो लाडू), अशोककुमार दिलपाक ( ०५ किलो लाडू), अरूण ओहळ (०५ किलो लाडू), शकुंतला गायकवाड (०५ किलो लाडू), दुर्गा गवई (०५ किलो लाडू), अंकुश पंडित- संभाजीनगर (०५ किलो लाडू), निवृत्ती सुरडकर- संभाजीनगर. (०५ लाडू), गिरीश उबाळे (मनीष असोसिएट, सोलापूर), आयु. वाघमारे बँक मॅनेजर- सोलापूर (२० किलो लाडू), राहुल बनसोडे- ठाणे (०५ किलो लाडू), छाया गायकवाड- ठाणे (०५ किलो लाडू. ) असे १०० किलो हून अधिक मिठाईचं संयुक्तरित्या वाटप यावेळी करण्यात आले.

