सोलापूर : पत्नी राणी हिचा मोटारसायकल विकत घेण्यासाठी व घर बांधण्यासाठी माहेरहुन पैसे आणण्यासाठी तिला त्रास दिला व तिला आत्महत्येस प्रवृत्त केले या आरोपावरुन तिचा पती तानाजी जनार्धन चव्हाण व जाऊ रमाबाई शिवाजी चव्हाण (दोघे रा. बैरागवाडी ता. मोहोळ) यांच्याविरुध्द भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालयात होऊन न्यायाधिशांनी दोन्ही आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
मोहोळ तालुक्यातील वाफळे येथील रमेश तानाजी साळुंखे यांनी 01 जुलै 2020 रोजी मोहोळ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत त्याची बहिण राणी हिचे लग्न आरोपी तानाजी चव्हाण याचेबरोबर सन 2018 साली झाल्यानंतर नवऱ्याने व जावेने मोटारसायकलसाठी व घर बांधणीसाठी माहेरवरुन पैसे आणण्यासाठी त्याच्या बहिणीला त्रास दिला व त्यामुळे त्याच्या बहिणीने 29 जून 2020 रोजी विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली, असा आरोप केला होता.
राणी ही विहीरीवर कपडे धुण्यास गेली असताना पाय घसरुन विहीरीत पडली व तिचा अपघाती मृत्यु झाला, असे आरोपी पक्षाचे म्हणणे होते. मोहोळ पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या प्रथम खबरीमध्ये राणीचा अपघाती मृत्यु झाला, असे नमुद करण्यात आले होते.
या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. श्रीहरी कुरापाटी, ॲड. किरण गवळी यांनी काम पाहिले.
