'त्या' शिक्षिकेविरूध्द शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

shivrajya patra

सोलापूर : शिक्षण विभागात आलेल्या अभ्यांगताकडं कामाबद्दल विचारणा केली असता, त्या शिक्षिकेने सोमवारी सायंकाळी शिक्षण अधिकाऱ्यास  माझे थकीत वेतन बिलाचे काम तुम्ही जाणीवपुर्वक करत नाही, असं म्हणून तु बाहेर ये तुला बघुन घेते. मी तुझ्यावर खोटी विनयभंगाची व ऍट्रॉसीटीची केस दाखल करते अशी धमकी दिल्याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शितल बबुशा काळे असं आरोपीत शिक्षिकेचं नांव आहे.

शिक्षिका शितल काळे हिने माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांना, माझं थकीत वेतन बिलाचे काम तुम्ही जाणीवपुर्वक करत नाही, असं म्हणून तु बाहेर ये तुला बघुन घेते, अशी एकेरीची भाषा वापरत धमकी दिली.

त्या शिक्षिकेने एवढ्यावरच न थांबता, मी  तुझ्यावर खोटी विनयभंगाची व ऍट्रॉसीटीची केस दाखल करते, अशी धमकी देत शिक्षण अधिकारी जगताप यांचा मोबाईल हिसकावुन घेऊन जगताप यांच्या अंगावर मोबाईल फेकून मारण्याचा प्रयत्न करुन शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला असल्याचं जगताप यांनी फिर्यादीत म्हटलं आहे.

सोमवारी सायंकाळी शिक्षण कार्यालयातील गोंधळानंतर या शिक्षिकेने शिक्षण अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केला होता. सदर बझार पोलिस ठाण्यात शितल बबुशा काळे हिच्याविरूध्द दाखल फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता कलम १३२,३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक साखरे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

To Top