'गॅस पेट्रोल दे ना सके जो ,वो सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है', घोषणांनी दुमदुमला परिसर
भंडारा : केंद्र सरकार च्या महागाई, बेरोजगारी, व संविधान विरोधात असणाऱ्या स्मार्ट मीटर व अवाढव्य वाढीव वीज बिला विरोधात, गॅस, पेट्रोल-डिझेल टंचाईविरोधात, नीट, टीईटी परीक्षा च्या गोंधळाविरोधात बहुजन मुक्ती पार्टी ने आंदोलन केले, त्याचाच एक भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'चूल' पेटवून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. सरकारविरोधी घोषणाबाजी ने परिसरातील सर्वांचं लक्ष केंद्रित केले होते, आंदोलनाच्या अखेरीस जनहितार्थ मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
जनतेची जनतेद्वारा जनतेसाठी निर्मित, स्टॅम्प पेपरवर चुनावी जाहीरनामा घोषित करणारी बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने देशहितासाठी व जनसामान्यांच्या दुःख व असहनिय पीडा लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या जनता विरोधी नीती विरोधात चरणबद्ध जनआंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या जनता विरोधी नीती विरोधात सामान्य जनतेच्या मनात संतापाची भावना आहे. या भावनांना अधोरेखित करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी ने चरणबध्द राष्ट्रव्यापी 'चूल पेटवा' आयोजित केलं होतं. या आंदोलनाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.'गॅस पेट्रोल दे ना सके जो, वो सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है', या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. देशातील 650 जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष सुभाष भिवगडे, रविदास लोखंडे, कपिल रंगारी, शरयू डहाट, मोहित वैद्य, बामणे सर, संजय भोले, मुकुल सूर्यवंशी, इलेक्ट्रिक मॅन अभय डी रंगारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागणी पूर्ण न झाल्यास 31 मे ला संपूर्ण देशभर राष्ट्रव्यापी 'दे धक्का' जनआंदोलन केले जाईल, असा गंभीर इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.



