सोलापूर : श्रीराम सेना तथा माहिती अधिकार कार्यकर्ते पत्रकार सिद्धाराम नंदर्गी यांच्या वाढदिवसानिमित्त अप्पाश्री मित्र परिवार व पत्रकार बांधवांच्या वतीने जिल्हा परिषद येथील बागेत गुरुवारी, 21 मे रोजी भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांना टोपी, शाल व पुष्पहार घालून त्यांचं अभिष्टचिंतन करण्यात आले.
या कार्यक्रमास तिसरी आंख मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



यावेळी प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख, लतिफ नदाफ, मिलिंद प्रक्षाळे, गिरमल्ला गुरव, अशोक ढोणे, राम हुंडारे, अक्षय बबलाद, मुस्ताक शेतसंदी, सलाऊद्दीन शेख, अकबर शेख, नितीन कांबळे, विश्वनाथ व्हनकुरे, महेश जाधव, नरेंन सब्बन, सुरज रजपूत, अश्फाक शेख, आदम मुलाणी, अस्लम नदाफ, आबा तळभंडारे, सुधीर ढोले, ऋषिकेश ढेरे तसेच आपाश्री मित्र परिवार, पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी सिद्धाराम नंदर्गी यांच्या सामाजिक व माहिती अधिकार क्षेत्रातील कार्याचा गौरव करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी सर्व उपस्थितांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.


