सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी - सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत पाटील

shivrajya patra

सोलापूर जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

सोलापूर/22 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणूकचा कार्यक्रम 04 दिवसांपूर्वी, 18 मे रोजी जाहीर झालेला आहे. या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात निवडणूक कामकाजासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या आदेशान्वये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

निवडणुकीदरम्यान सर्व कामकाज पारदर्शक व सुरळीत पार पडावे, यासाठी आवश्यक ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या जबाबदारीची सविस्तर माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत पाटील यांनी देऊन सर्व नोडल अधिकाऱ्यांनी परस्परात समन्वय ठेवून काटेकोरपणे कामे करावीत, असं आवाहन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित विधान परिषद निवडणूक नोडल अधिकारी आढावा बैठकीत पाटील मार्गदर्शन करत होते. 

यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस उपयुक्त अश्विनी पाटील, समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विना पवार, जिल्हा प्रशासनाधिकारी नगरपालिका योगेश डोके, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी रवी पवार, तहसीलदार दिनेश पारगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

निवडणुकीदरम्यान मनुष्यबळ व्यवस्थापन, प्रशिक्षण, साहित्य, वाहतूक, सायबर सुरक्षा, SVEEP योजना, कायदा व सुव्यवस्था, आचारसंहिता पालन, खर्च निरीक्षण, मतपत्रिका व पोस्टल बॅलेट, माध्यम व्यवस्थापन, तक्रार निवारण, निरीक्षक समन्वय, दिव्यांग मतदार सुविधा, एएमएफ, स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्र, सीमा व्यवस्थापन, दारू नियंत्रण, अन्न व्यवस्थापन, वन विंडो प्रणाली, जिल्हा नियंत्रण केंद्र, सूक्ष्म निरीक्षक, सोशल मीडिया निरीक्षण व वैद्यकीय सुविधा अशा 28 क्षेत्रांसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, असे पाटील यांनी सांगून सर्व संबंधित नोडल अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबदाऱ्याची माहिती दिली. 

***                                                  

To Top