तरूणावर भरदिवसा प्राणघातक हल्ला !

shivrajya patra

पुणे/रमजान मुलाणी : कात्रज परिसरात जुन्या वादातून ऑटो चालकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. रविवारी दिवसाढवळ्या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आंबेगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 03 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना गजाआड केलंय.

सूरज माणिक काळे (वय-30 वर्षे) असं जखमीचं नांव आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय. पुण्यात दिवसाढवळ्या असा हल्ला होणे चिंताजनक असल्याचं मानलं जात आहे.

प्रवासी भरण्यावरून दोन-तीन वर्षांपूर्वी झालेल्या वादातून ही हल्ल्याची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. 03 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.


To Top