सोलापूर : सोलापूरचे सुपुत्र, ज्येष्ठ बाल साहित्यिक "गुलबुटे" या उर्दू मासिकाचे संपादक, अनेक राष्ट्रीय स्तरावर उर्दूचे संमेलनाचे आयोजक फारूक गुलाम नबी सय्यदखाँ उर्फ फारूक सय्यद यांचे मंगळवारी, मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले . ते मृत्यू समयी 60 वर्षीय होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
मुंबई येथील नारेलवाडी कब्रस्तान येथे उद्या बुधवारी, 20 मे रोजी दुपारी 02 वाजता त्यांचा दफनविधी करण्यात येणार आहे. सोशल प्राथमिक उर्दू शाळेचे मुख्याध्यापक आसिफ इक्बाल आणि सीए मौलाना शेख यांचे ते मामा होत.
