सोलापूर : येथील कुमठा नाका परिसरातील रहिवासी आंबेडकरी चळवळीतील सक्रीय नेते तथा काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांचं शनिवारी, 23 मे रोजी सकाळी 11 : 00 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचं सांगण्यात आलंय.
त्यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू, लढवय्या आणि जनसामान्यांसाठी झटणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
🕯️
जनसामान्यांसाठी झटणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड : काँग्रेस कमिटी, सोलापूर शहर
माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू, लढवय्या आणि जनसामान्यांसाठी झटणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असल्याची भावना सोलापूर शहर काँग्रेस कमिटीनं म्हटलं आहे.
