छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त 369 वृक्ष रोपट्यांचं वाटप

shivrajya patra

संभाजी ब्रिगेडने दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश 

सोलापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369 व्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने अनावश्यक खर्चाला फाटा देऊन छत्रपती संभाजी महाराज चौकात एक वृक्ष शंभुराजे साठी या संकल्पनेवर  369 रोपटी वाटप करण्यात येऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. 

शौर्य आणि पर्यावरणाचा जागर करून शंभूराजांच्या विचारांचा वारसा जपत, 'पर्यावरण रक्षण' हाच खरा राजधर्म मानून छत्रपती संभाजी महाराज जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. 

सोलापूर शहराचे तापमान 44°C - 45°C च्या पुढे जात आहे. सिमेंटची जंगले आणि कमी झालेली वृक्षसंख्या यामुळे सोलापूरवासीय उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकाडा असह्य होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या अनेक नागरिकांनी स्वागत आणि कौतुक केलंय.


To Top