"वाचू संविधान 12 तास" स्पर्धा ! स्पर्धकांना पारितोषिके प्रदान

shivrajya patra

सोलापूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त डॉ. वै. स्मृ. शा. वैद्यकीय महाविद्यालयात 16 एप्रिल रोजी "वाचू संविधान 12 तास" या अभिनव अध्ययन अभियान व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील पारितोषिक पात्र स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी महाविद्यालयाच्या एसी हॉलमध्ये उत्साहात पार पडला. 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त डॉ. वै. स्मृ. शा. वैद्यकीय महाविद्यालय व महाकारूणिक एज्युकेशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 16 एप्रिल रोजी "वाचू संविधान 12 तास" या अभिनव अध्ययन अभियान व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.  ही स्पर्धा महाविद्यालयाच्या ग्रंथालयात सकाळी 08 ते सायंकाळी 08 वाजण्यादरम्यान पार पडली. या स्पर्धेमध्ये वय वर्षे 09 ते 69 वर्षापर्यंतच्या विविध वयोगटातील 101 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. 

स्पर्धेसाठी भारतीय संविधानाचे कलम 001 ते 200 ठेवण्यात आले होते. या अभ्यासक्रमावर बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांतून बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.  डॉ. वै. स्मृ. शा. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

कार्यक्रमाची सुरुवात ॲड. रवी गजधाने यांच्या बुद्ध वंदनेने झाली तर मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक धर्मादाय आयुक्त संजय पाईकराव व उपाधिष्ठाता डॉ. चंद्रकांत वाघमारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या स्पर्धकांना महिला व पुरुष गटात प्रत्येकी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. स्मृतिचिन्ह, पदक, प्रमाणपत्र व रोख रक्कम असं पुरस्काराचे स्वरूप होते. प्रथम क्रमांकाला 10,000 रुपये, द्वितीय क्रमांक 05,000 आणि तृतीय क्रमांक 03,000 तर उत्तेजनार्थ 01,000 रुपये रोख पारितोषिक देण्यात आले.

स्पर्धेचा निकाल व पारितोषिके याप्रमाणे आहेत...

✨ महिला गट

➡️ 01) शहिद माधवराव लक्ष्मणराव पराग यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक - प्रिती सुर्यवंशी- 90 गुण

➡️ 02) बाळासाहेब भगवान कदम यांच्या सौजन्याने द्वितीय पारितोषिक- सरस्वती कांबळे- 86 गुण 

➡️ 03) आयु. विद्या सुरेश रोडे यांच्या सौजन्याने तृतीय पारितोषिक- श्रध्दा माने - 84 गुण

➡️ 04) कै. तुकाराम बळी बंदिछोडे यांच्या स्मरणार्थ उत्तेजनार्थ पारितोषिक- श्रावणी कांबळे - 82 गुण 

➡️ 05) कालकथित सुखदेव बापू साबळे यांच्या स्मरणार्थ उत्तेजनार्थ पारितोषिक - तत्वता ढोबळे - 82 गुण

➡️ 06) काल कथित संदिपान शामराव कसबे यांच्या स्मरणार्थ उत्तेजनार्थ पारितोषिक - विद्या पवार - 74 गुण, वल्लभी सोनवले - 70 गुण व वैष्णवी चाबुकस्वार - 68 गुण

✨ पुरुष गट

➡️ 01) कै. संभाजी पांडुरंग तोडकर यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक-  प्रणव म्हेत्रे - 94 गुण

➡️ 02)कालकथित अर्जुन कृष्णा खरे यांच्या स्मरणार्थ द्वितीय पारितोषिक- समर्थ सोमवंशी - 90 गुण 

➡️ 03) स्व. डॉ. सतिश वसंतराव चिटणीस यांच्या स्मरणार्थ तृतीय पारितोषिक- शुभम गवळी - 90 गुण

➡️ 04) कालकथित मातोश्री केवळबाई साहेबराव वाघमारे यांच्या स्मरणार्थ उत्तेजनार्थ पारितोषिक- विनय सर्वगोड - 90 गुण

➡️ 05) कालकथित शामराव सिद्राम सरवदे यांच्या स्मरणार्थ उत्तेजनार्थ पारितोषिक- डॉ. विवेक जैन - 90 गुण 

➡️ 06) सौ. विजया नारायण डांगे यांच्या सौजन्याने उत्तेजनार्थ पारितोषिक- अश्विनीकुमार साबळे - 88 गुण, महेश रासे - 86 गुण आणि  डॉ. शुभम मोहिते - 86 गुण

याबरोबरच 15 वर्षाच्या आतील व 60 वर्षांपुढील स्पर्धक आनंद बनसोडे, स्वराली पौळ, विरासत थोरे, मुग्धा आखाडे, अद्वैत डावरे, डॉ. मीना गायकवाड, डॉ. देविदास गायकवाड, कमल थोरे, मीनाक्षी कर्णेकर व सुरेखा साबळे यांना ॲड. अमित कांबळे यांच्या सौजन्याने पदक व रोख 200 रुपये विशेष सन्मान म्हणून देण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन व कौतुक केले. ज्यांना पारितोषिक मिळाले नाही, त्यांनी नाराज न होता पुढील वर्षी अधिक जोमाने अभ्यास करून पारितोषिक मिळण्याचा प्रयत्न करावा, असे मान्यवरांनी आवाहन केले. 

तसेच भारतीय संविधानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, याकरिता अशा प्रकारच्या स्पर्धांचे विविध ठिकाणी आयोजन करणे गरजेचे असल्याचे मान्यवरांनी प्रतिपादन केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर औदुंबर मस्के यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदा काटे, अमोल वाघमारे, राजरत्न फडतरे, अशोक मस्के, आतुर काटे, डॉ. गजानन जत्ती, डॉ. प्रशांत शिरुरे, डॉ. आकांक्षा डांगे, डॉ. अंकुरसिंग गुणावत, डॉ. विशाल अंभोरे, आनंद शिंदे आणि विशाल इरागंटी यांनी परिश्रम घेतले.

To Top