अल्लाउद्दीन बाबा उरुसाची जय्यत तयारी; 07 मेपासून भक्तिभावाच्या उत्सवास प्रारंभ

shivrajya patra

मोहोळ : तालुक्यातील कामती (बु.) येथे अल्लाउद्दीन बाबा उरुस, 07 आणि 08, मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार असून गावात सध्या तयारीचा माहोल रंगला आहे. अल्लाउद्दीन बाबा हे मुस्लिम आणि हिंदू बांधवांचं समान श्रद्धास्थान मानलं जात असल्याने या उरुसाला विशेष महत्त्व आहे. 

सर्वधर्मीय ऐक्याचे प्रतीक ठरलेला हा उत्सव बौद्ध पौर्णिमेनंतर येणाऱ्या गुरुवार-शुक्रवारी हा उर्स भरविण्याची परंपरा असून, दरवर्षी हा उर्स मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडतो. यंदाही भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

उर्सच्या पहिल्या दिवशी, 07 मे रोजी गावातून पारंपरिक संदल मिरवणूक निघणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात निघणाऱ्या या मिरवणुकीत परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.

08, मे रोजी कामती गावची यात्रा भरविण्यात येणार असून विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. यावेळी गावात उत्सवी वातावरण निर्माण होऊन भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.

उर्सनिमित्त रविवारी, 10 मे रोजी जंगी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी २ ते ४ या वेळेत कुस्त्यांचे सामने रंगणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन यात्रा समितीचे अध्यक्ष अफसर मुजावर, सचिव समीर मुजावर आणि नामदेव खराडे उस्ताद यांनी केलं आहे.

To Top