भोंदूगिरीच्या विरोधातील लोकांना संपवण्यात आले : प्रा. डॉ. गणेश बेळंबे

shivrajya patra

 

वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेचा समारोप

सोलापूर : 12 व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समाजातील कर्मकांडातील भोंदूगिरी उघड करत देवाला म्हणजे ईस्टलिंगाला आपल्या हातात दिले. ज्या-ज्या संतांनी भोंदूगिरीला विरोध केला, त्यांना त्याकाळच्या प्रचलित समाजव्यवस्था व्यवस्थेकडून संपविण्यात आले, असे प्रतिपादन प्रा. डॉ. गणेश बेळंबे यांनी केले.

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव व्हिजनच्यावतीने आयोजित केलेल्या बसव व्याख्यानमालेचे समारोपाचे पुष्प गुंफताना डॉ. बेळंबे बोलत होते. 'ऐसे कैसे झाले भोंदू' असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. 

याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे,  जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी, माजी नगरसेवक गुरशांत धुत्तरगावकर, भाजपा जिल्हा सदस्य जगन्नाथ गायकवाड, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार उपस्थित होते.

यावेळी बोलताना बेळंबे पुढे म्हणाले की, सर्वसामान्यांच्या बुद्धीचा भ्रम करून भोंदूबाबा त्यांचा गैरफायदा घेतात. आपल्या शिष्यावरच अत्याचार करतात आणि धनिकांचा पैसा लुटतात. सध्याच्या काळात विकाराचा पूर वाहत आहे म्हणून सदाचाराचा पूर येत नाही.

याप्रसंगी प्रा. भीमाशंकर बिराजदार, प्रा. संगमेश्वर नीला, प्रा. शिवराज बिरादार, आनंद दुलंगे, संजय साखरे, सोमेश्वर याबाजी, नागेश बडदाळ, राजेश नीला, मनोज पाटील आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुरकुले यांनी, स्वागत विजयकुमार बिराजदार यांनी केले. वक्त्यांचा परिचय राहुल बिराजदार यांनी करून दिला. सूत्रसंचालन महेश कोटीवाले यांनी केले. शेवटी सोमेश्वर याबाजी यांनी आभार व्यक्त केले. 

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अविनाश हत्तरकी, सोमनाथ चौधरी, बसवराज जमखंडी, सिद्धेश्वर कोरे, गंगाधर झुरळे, गौरीशंकर अतनुरे, प्रा. मल्लिकार्जुन पाटील, अमित कलशेट्टी, विजयकुमार हेले, शांतवीर बसवंती यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी : वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेचे उद्घाटन करताना आ. देवेंद्र कोठे, रामप्पा चिवडशेट्टी, गुरुशांत धुत्तरगावकर, जगन्नाथ गायकवाड, राजशेखर बुरकुले, विजयकुमार बिराजदार छायाचित्रात दिसत आहेत.

To Top