महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचं अभिवादन

shivrajya patra

सोलापूर : मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त बसवेश्वर सर्कल येथील पुतळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रविवारी अभिवादन करण्यात आले.  

यावेळी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरचे जिल्हाध्यक्ष म. शफीक रचभरे, शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांच्यासह अन्य पदाधिकारी-कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top