फिजिक्स वालाच्या विद्यार्थ्यांचं CBSE 10 वी (2026) मध्ये विक्रमी यश

shivrajya patra

सोलापूर : शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था फिजिक्सवाला (PW) साठी गुरुवारचा दिवस उत्सवाचा ठरला. CBSE इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षा 2026 मध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत उच्च गुण मिळवले असून, काही विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुणांचीही कामगिरी केली असल्याची माहिती अकॅडमी हेड विनिता कंधारी यांनी दिली.

देशातील अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पंजाबमधील फाजिल्का येथील वैभव अरोरा, गुजरातमधील अहमदाबाद येथील अमोलिक पंडिता आणि ओडिशातील भुवनेश्वर येथील आयुष्यमान मोहापात्रा यांनी 100 टक्के गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे, असं अकॅडमी हेड विनिता कंधारी यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना प्रारंभी म्हटले.

फिजिक्सवालाच्या तंत्रज्ञान-सक्षम हायब्रिड शिक्षण केंद्र ‘PW विद्यापीठ पाठशाळा’ च्या सोलापूर शाखेत CBSE 10 वी (2026) च्या निकालानंतर यानिमित्त विशेष सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आले होतं. CBSE 10 वी बोर्ड परीक्षा 2026 मध्ये उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या सोलापूरमधील विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

सोलापूरमधील यशराज प्रविण भोसले याने 99 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

आपल्या यशाबद्दल सांगताना वैभव अरोरा म्हणाला, “सातत्यपूर्ण तयारी, नियमित सराव आणि शाळा तसेच PW शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे मला हे यश मिळवता आले.”

अमोलिक पंडिता म्हणाली, “नियमित अभ्यास आणि नमुना प्रश्नपत्रिकांचा सराव केल्यामुळे 100 टक्के गुण मिळवण्यात मोठी मदत झाली.”

आयुष्यमान मोहापात्रा याने सांगितले, “शिस्तबद्ध अभ्यास आणि नियोजनबद्ध तयारीमुळे पूर्ण गुण मिळवणे शक्य झाले.”

निकालांवर प्रतिक्रिया देताना फिजिक्सवालाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अलख पांडे म्हणाले, “परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे आम्ही कौतुक करतो. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन. हे यश सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सक्षम शैक्षणिक प्रणालीचे प्रतीक आहे.”

यावर्षी CBSE इयत्ता 10 वी परीक्षेसाठी 25 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. या निकालातून शैक्षणिक यशामध्ये ऑनलाइन आणि हायब्रिड शिक्षणाच्या वाढत्या प्रभावाची नोंद घेतली जात आहे.

यावेळी विद्यार्थी यशराज भोसले, लाया जालिहाल, इरफान पठाण, आरुषी चौधरी, राही कुलकर्णी, समृद्धी अदलिंगे यांच्यासह डायरेक्टर श्लोक कडव, वृध्दी कडव तसेच फॅकल्टी विभागातील धर्मेंद्र विश्वकर्मा,अमित वर्मा, विशाल यादव, राहुल सिंह आदी उपस्थित होते.

...... चौकट ...

 फिजिक्स वाला अकॅडमी सोलापूर सेंटरचे गुणवंत विद्यार्थी !

🟩 यशराज प्रवीण भोसले- 99.00

🟥 लाया जालीहाल        - 91.40    

🟩 इरफान जमाल पठाण- 97.60

🟥 आरुषी जयेश चौधरी-  92.00

🟩 राई नितीन कुलकर्णी-  90.00

🟥 समृद्धी सुहास आदलिंगे- 92.20


To Top