समता सैनिक दलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

shivrajya patra
सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मंगळवारी, 14 एप्रिल रोजी समता सैनिक दल शहर-जिल्हा सोलापूरच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी समता सैनिक दलाच्या जीओसी सुमित्रा केरू जाधव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
त्यानंतर समता सैनिक दलातील पुरुष व महिला सैनिकांच्या वतीने मानवंदना देऊन भीम गीत सादर करण्यात आले. 
यावेळी समता सैनिक दलाचे ज्येष्ठ सल्लागार समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, महासचिव अनिल जगझाप, विठ्ठल थोरे, अंगद जेटीथोर, चंद्रकांत कोळेकर, बाळासाहेब मस्के, विनोद जाधव, वर्षा जाधव, प्रीती जाधव, प्रीपोवेल जाधव, ज्ञानेश्वर प्रक्षाळे  मुकुंद चंदनशिवे, संभाजी तळभंडारे, रत्नदीप कांबळे, सुचित्रा थोरे, सुनील डांगे, सुनिता गायकवाड, शांतीकुमार कांबळे, कुणाल जानराव, अरुण भालेदार, अंकुश बनसोडे, अशोक सिदगणेश, रेखा पात्रे, शिवकुमारी कांबळे, कल्पना सुरवसे, अरुण गायकवाड, दिनेश सुरवसे, सुरज प्रक्षाळे, सविजेता जाधव, संविधा जाधव, सूर्यकांत शिवशरण, विजयकुमार शिरसागर, बी. एस. गायकवाड,  एम. बी. कांबळे, चंद्रकांत गायकवाड, भारत मस्के, पोथलीकर सर इत्यादी पुरुष व महिला सैनिकांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव यांनी परेड संचलन आदेश दिले.
*****
To Top