सोलापूर : येथील पोलीस आयुक्तालय अंतर्गत महिला सुरक्षा विशेष कक्ष भरोसा सेल व पंडित दिनदयाळ उपाध्याय डेंटल कॉलेज, केगांव, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरात महिला सुरक्षा जनजागृती कार्यक्रम अंतर्गत गुरुवारी, 16 एप्रिल रोजी शहराच्या विविध भागात पथनाट्य सादर करण्यात आले. 
हे पथनाट्य विडी घरकुल, तरटी नाका परिसर, सिध्देश्वर मंदिर, सातरस्ता, चार हुतात्मा पुतळा या प्रमुख ठिकाणी सादर करण्यात आले. या पथनाट्यात महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला बळी न पडता तात्काळ भरोसा सेलची मदत घेण्याबाबत सांगण्यात आले. आजवर 'भरोसा सेल' या ठिकाणी पती-पत्नी समुपदेशन करून संसार जुळविण्याचं काम केलं आहे. 
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार सर, पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सुरक्षा विशेष कक्ष (भरोसा सेल) पोलीस निरीक्षक श्रीमती स्नेहा म्हेतर, भरोसा सेल टीम तसेच पंडित दिनदयाळ उपाध्याय डेंटल कॉलेज, केगांव, सोलापूर येथील डॉ. अनुराधा मोकाशी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी केली.
