सहकार भारतीच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न- जिल्हा कार्यवाह ऋषीकेश कुलकर्णी

shivrajya patra

सोलापूर :  व्हिजन एक्स्पो फॉर वुमेन एम्पावरमेंट या संकल्पनेतून सोलापूर जिल्हा सहकार भारतीच्या वतीने महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह ऋषीकेश कुलकर्णी यांनी केले. 

सोलापूर जिल्हा सहकार भारतीच्या वतीने आयोजित महिला उत्पादित वस्तुच्या राज्यस्तरीय एक्स्पोच्या कार्यालयाचे उद्घाटन चौपाड येथे कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी या एक्स्पोच्या स्वागताध्यक्षा सुधा अळ्ळीमोरे, विभाग प्रमुख संतोष गायकवाड, डॉ. जयंत शेळगीकर, प्रशांत बडवे आदी मान्यवर उपस्थित होते.

महिलांची संघटन शक्ती एकत्र करून त्यांना सक्षम करणे हेच सहकार भारतीचे काम आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह ऋषीकेश कुलकर्णी यांनी सांगितले. 

शुक्रवारी, 24 आणि 25 एप्रिल या कालावधीत नॉर्थकोट मैदानावर भव्य दिव्य असे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील महिलांकडून उत्पादित करण्यात आलेल्या वस्तु आणि पदार्थाचे राज्यस्तरीय प्रदर्शन सोलापूर मध्ये पहिल्यांदाच होत असल्याचे या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा सुधा अळ्ळीमोरे यांनी सांगितले. 

कला, स्वाद व संस्कृतीचा अनोखा संगम नॉर्थकोटच्या मैदानावर होणार आहे, याचा अनुभव घेण्यासाठी महिला पुरूषांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. 

प्रारंभी महिला प्रकोष्ठ प्रमुख प्राची धामणगांवकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. नंतर फित कापून आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करून कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. 

यावेळी किरण करकमकर, यशवंत बुर्‍हाडे, अर्चना कुलकर्णी, श्रृती पवार यांच्यासह सहकार भारतीचे पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top